Nach Ga Ghuma Madhugandha Kulkarni Share a video of inspiration : महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर “नाच गं घुमा” (Nach Ga Ghuma) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून घेतली. ( Marathi Movie ) चित्रपटाची क्रेझ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी होतीच पण आता चित्रपट गृहात देखील याची क्रेझ बघायला मिळत आहे. मात्र हा चित्रपट नेमका कोणावरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे. याचा खुलासा नुकताच चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णीने ( Madhugandha Kulkarni ) एक व्हिडीओ शेअर करत केला आहे.
हे माझ्या काकींचं घर; अजितदादांवर प्रश्न विचारताच सुळे ठणकावून सांगितलं
मधुगंधा कुलकर्णीने या व्हिडीओमध्ये तिच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेला घेतले आहे. त्यात तीने सांगितले की, “नाच गं घुमा” हा चित्रपट याच महिलेवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे. कारण या महिलेशिवाय मधुगंधाच्या घरातील कामं कशी अपूर्ण आहेत. ती आली नाही तर तीचा किती खोळंबा होतो. यातून या चित्रपटाची कथा जन्माला आली आहे. तसेच नाच गं घुमा हा चित्रपट पूर्णपणे नोकरदार महिलांना त्यांच्या आयुष्यात घरात काम करणारी एक महिला किंवा मेड कीती गरजेची असते हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे.
“माझ्याशी गाठ करणं सोपं नाही” दत्ता मामांच्या दमदाटीचा व्हिडिओ रोहित पवारांकडून व्हायरल
तर या व्हिडीओमध्ये मधुगंधा कुलकर्णीने तिच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत खास गप्पा मारल्या आहेत. मंजू असं या मधुगंधाच्या घरात काम करणाऱ्या महिलेचं नाव आहे. तसेच दिग्दर्शक आणि मधुगंधाचा पती परेश यांनी हा व्हिडीओ शुट केला आहे. त्यावर त्यांनी त्या दोघींना एकमेकींबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. त्यावरून मधुगंधा आणि मंजूमध्ये किती घट्ट नात आहे. हे दिसून येत आहे.
दरम्यान स्वप्नीलची (Swapnil Joshi) निर्मिती असलेला हा पहिला वहिला चित्रपट आणि त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. याबद्दल स्वप्नीलने सांगितलं आहे की, बघता बघता आमचा चित्रपट तुमच्या भेटीला आला आहे. तुम्ही त्याला भरभरून प्रेम मिळत आहे, यात शंका नाही. निर्मिती करायचे दडपण होते पण प्रमोशन आणि सोशल मीडियावरून या चित्रपटाला तुम्ही जे प्रेम देताय ते बघून खूप आनंद होतोय. पुढे म्हणाला की, मला अभिनेता म्हणून जसं स्वीकारलं तसच एक निर्माता म्हणून देखील आपलंसं करून घेणार याची मला खात्री आहे.