Download App

नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाचे कधी करणार लग्न? अखेर अभिनेत्याच्या कुटुंबातील सदस्याचं मोठं विधान

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Wedding: नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) सध्या चर्चेत आहेत.

Naga Chaitanya Sobhita Dhulipala Wedding: नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) सध्या चर्चेत आहेत. (Naga Chaitanya Sobhita Dhulipala Wedding) या जोडप्याने त्यांचे नाते खूप लपवून ठेवले होते. तरी त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी एंगेजमेंट केले आणि ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचे जाहीर केले. सध्या चाहते दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. आता नागा आणि शोभिताच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याबाबत माहिती समोर आली .


नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाचे लग्न कधी होणार?

मिळालेल्या माहितीनुसार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला वर्षाच्या अखेरीस किंवा मार्च 2025 मध्ये लग्न करू शकतात. अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, या जोडप्याच्या लग्नाच्या ठिकाणाच्या पर्यायांमध्ये राजस्थानचा समावेश आहे. चैतन्य आणि शोभिता त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी मध्य प्रदेश आणि परदेशातही डेस्टिनेशन शोधत असल्याचे बोलले जात आहे.

नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने साऊथ स्टार समंथा रुथ प्रभूसोबत गोव्यात लग्न केले होते. मात्र, त्यांचा घटस्फोट झाला.

नागार्जुन आपल्या मुलाच्या लग्नाच्या तारखेबद्दल काय म्हणाले?

दरम्यान, आपल्या मुलाला पुढे जाताना पाहून नागार्जुनला आनंद होतो. त्यांनी सांगितले की, या जोडप्याला लग्नाची घाई नाही. या जोडप्याच्या लग्नाच्या योजनांबद्दल टाईम्स नाऊशी बोलताना ते म्हणाले, “लगेच नाही.” “आम्ही घाईघाईत एंगेजमेंट करायचं ठरवलं कारण तो शुभ दिवस होता, आणि चैतन्य आणि शोभिता यांना लग्न करायचंय याची पूर्ण खात्री असल्याने आम्ही म्हणालो, चला ते करू.”

समांथाच्या EX नवऱ्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, नागा चैतन्यच्या आयुष्याची नवी सुरुवात

तेलुगू सुपरस्टारने सांगितले की, नागा आणि सामंथाच्या वेगळे होण्याच्या निर्णयानंतर चैतन्य ‘दु:खी’ होता. “चैतन्यला पुन्हा आनंद मिळाला. तो खूप आनंदी आहे. मी पण आहे! कुटुंबासाठी ही सोपी वेळ नव्हती. सामंथापासून वेगळे झाल्याने त्याला खूप दुःख झाले होते. माझा मुलगा त्याच्या भावना कोणाला दाखवत नाही. पण तो नाखूष होता हे मला माहीत होतं. तिला पुन्हा हसताना पाहण्यासाठी केलं आहे, पुढे नागार्जुन म्हणाले की, “त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.

follow us