Download App

Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुनवर कोसळला दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन

  • Written By: Last Updated:

Nagarjuna Sister Naga Saroja Passed Away: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) कायम चर्चेत असतो. दिवंगत दिग्गज अभिनेते अक्किनेनी नागेश्वर राव यांची मुलगी आणि सुपरस्टार नागार्जुनची मोठी बहीण नागा सरोजा (Naga Saroja) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नागा सरोजा यांची गेल्या काही दिवसांपासून आजारी होती.

नागार्जुनची मोठी बहिण अर्थात नागा सरोजा यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. अखेर 17 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे.नागा यांच्या निधनाचा अक्किनेनी आणि नागार्जुनला मोठा धक्का बसला आहे. राजकीय आणि सिनेसृष्टीतील मंडळी नागार्जुनची सध्या भेट घेत आहेत.

Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण

नागार्जुन यांच्या तीन पिढ्या मनोरंजनसृष्टीत आपले अधिराज्य गाजवत आहे. तेलुगू सिनेमांत अक्किनेनी कुटुंबाचा मोठा वाटा आहे. नागा सरोज यांनी सिनेमामध्ये काम केलं नसलं तरी पडद्यामागे त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. नागार्जुनचा प्रत्येक सिनेमा त्या आवडीने बघायला येत असत. अनेक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये देखील पहिली त्यांची हजेरी लागत असत.

नागार्जुन यांच्या तीन पिढ्या मनोरंजनसृष्टीत अॅक्टिव्ह असल्या तरी अक्लिनेनींची तिसरी मुलगी अर्थात सरोज या मात्र कायम मनोरंजनसृष्टीतपासून लांब असल्याचे बघायला मिळाले. मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा विचार त्यांच्या मनात एकदाही आला नाही. घरात अभिनयाचं बाळकडू असून देखील अभिनेत्री होण्याचं स्वप्न त्यांनी कधी बघितलं नाही.

Tags

follow us