Download App

Baplyok Release Date : नागराजच्या बापल्योकची रिलीज डेट बदलली; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

Baplyok Release Date : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. मात्र आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार आता चित्रपटाची रिलीज डेट ( Release Date ) बदलण्यात आली आहे.

Girish Oak Post: अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

‘या’ दिवशी येणार चित्रपट…

नागराज मंजुळे यांच्या बापल्योक (Baplyok Marathi Movie) चित्रपटामध्ये गावाकडच्या बाप लेकाच्या नात्यातील तरल गोष्ट दाखवण्यात येणार आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार होता. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट ( Release Date ) बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट 25 ऑगसटला नाही तर 1 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! भल्या पहाटेच चंद्रावर मारली चक्कर; पहिला फोटो आला समो

कसा आहे चित्रपट?

‘बापल्योक’ या सिनेमामध्ये बाप लेकाची एक हलकाफुलका प्रवास पाहायला मिळणार आहे. या सिनेमाद्वारे बाप आणि लेकाचा भावनिक विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामध्ये एक चौकोनी कुटुंब बघायला मिळणार आहे. यामध्ये एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण बघायला मिळत आहे. यामध्ये ते सर्वजण त्या मुलाकडे कौतुकाने बघत असल्याचे बघत असल्याचे दिसून येत आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या सिनेमाची निर्मिती केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. नागराज मंजुळे हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘बापल्योक’ या सिनेमाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने आणि विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत.

Tags

follow us