Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळे, सयाजी शिंदे चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. ‘ घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 25T143331.234

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 25T143331.234

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. ‘

घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले.

‘साब ये लडका बडा होके….’ कुशल बद्रिकेनं सांगितला लहानपणीचा किस्सा

या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे. तसेच या सिनेमाविषयी त्यांनी भाष्य देखील केले आहे. चित्रपटाबद्दल फारसे काही सांगणार नाही. खरंतर हा चित्रपट करण्यास मी आधी नकार दिला होता. मात्र नकळतच माझ्या नकाराचे होकारात रूपांतर झाले. चित्रपटाची कथा चांगली आहे , त्यानुसार गाण्यांचेही लेखन झाले आहे आणि त्याला साजेसे असे संगीत आहे. या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल, असे नागराज म्हणाला आहे.

Akash Thosar म्हणतो… ‘सैराट’नंतर ‘यामुळे’ अनेक चित्रपट साईन केले नाही!

दरम्यान, झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.

Exit mobile version