Akash Thosar म्हणतो… ‘सैराट’नंतर ‘यामुळे’ अनेक चित्रपट साईन केले नाही!

Akash Thosar म्हणतो… ‘सैराट’नंतर ‘यामुळे’ अनेक चित्रपट साईन केले नाही!

मुंबई : केवळ मराठी चित्रपट सृष्टीत नाही तर भारतात प्रादेशिक भाषेत इतिहास निर्माण करणारा सैराट हा सिनेमा गणला गेला आहे. या सैराट चित्रपटाततील प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेता आकाश ठोसर याने आपण ‘सैराट’नंतर चित्रपट का साइन केले नाहीत याचा नुकताच खुलासा केला आहे. आकाश म्हणतो की, मला असे काही करायचे नव्हते ज्यामुळे लोकांचे माझ्यावरील प्रेम कमी होईल.

आकाश ठोसर सांगतो की, सैराट चित्रपटामुळे मला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. त्यामुळे ते प्रेम मला गमवायचे नव्हते. ‘सैराट’नंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण, मी कोणताही चित्रपट स्वीकारण्यापूर्वी सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतरच निर्णय घेतो. परंतु, सैराट चित्रपट संपूर्ण भारतात सर्वत्र यशस्वी झाला. त्यामुळे मला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. कारण, अशाप्रकारचे प्रेम मी यापूर्वी कधीही ते अनुभवले नव्हते. त्यामुळे मला हे प्रेम गमवायचे नव्हते.

Jitendra Awhad : दुस-यासाठी खड्डा खणतो तो…; आव्हाडांनी केंद्र सरकारला फटकारले – Letsupp

नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदुक बिर्याणी’ या सिनेमात अभिनेता आकाश ठोसर झळकत आहे. त्याबद्दल तसेच आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल आकाश सांगतो की, मला चाहत्यांचे मिळालेले प्रेम गमावण्याचे नव्हते. आपण खूप चित्रपट साइन केले असते तर हेच प्रेम गमावण्याची भीती वाटत होती. म्हणूनच सहा वर्षांच्या कारकिर्दीत निवडक चित्रपट निवडण्याचे ठरवले होते, असे सांगत आकाश म्हणतो, “मला असे काही करायचे नव्हते ज्यामुळे लोकांचे माझ्यावरील प्रेम कमी होईल. मला फक्त प्रेम आणि पैसा मिळत असल्याने मला १० चित्रपट साइन करायचेच नव्हते. जर मी एखादा फ्लॉप चित्रपट केला तर लोक विचार करतील आणि माझ्यावरचे प्रेम कमी होईल. कारण मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. सरकारी नोकरी मिळणे, आई-वडिलांचा सांभाळ करणे ही माझी स्वप्ने होती. मला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली नाही, असे आकाश सांगतो.

आकाश ठोसर म्हणतो की, मला मिळालेल्या स्टारडमप्रमाणे आणखी एका गोष्ट मी फार गंभीरपणे घेत नाही. कोणीही केलेल्या नकारात्मक कमेंट्स, वक्तव्य, टिप्पण्या या गोष्टीकडे मी फार गंभीरपणे लक्ष देत नाही.

(220) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube