Download App

Nagraj Manjule: ‘नागराज मंजुळेंचा बायकोबद्दल वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ‘पहिली भेट आम्ही…’

Nagraj Manjule Post: मराठी सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णीबद्दलचं (Gargi Kulkarni) ते वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आला आहे. गार्गी आपला आरसा आहे. (Nagraj Manjule Post) आपण कोणताही सिनेमा बनवत असताना तिचं मत महत्त्वाचं असतं. माझ्या लिहिलेल्या प्रत्येक पटकथा गार्गी वाचते, असं नागराज मंजुळेंनी यावेळी सांगितलं आहे. म्हणाले, त्यांची आणि गार्गीची पहिली भेट कुठे झाली होती, याबद्दल देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.


एका मुलाखती दरम्यान बोलत असताना नागराज मंजुळे म्हणाले की, “आम्ही अहमदनगरला शिकायला एकत्र होतो, तेव्हा मी आणि गार्गीची नेहमी भेट होत असायची. गार्गीला वाचायची खूप आवड आहे, ती स्वतः कविता लिहित असते. मी जेव्हा कोणतीही पटकथा लिहित असतो, तेव्हा ती दोन माणसांना आवर्जून ऐकवत असतो. त्यांच्या होकार-नकारात किंवा चांगलं-वाईट सांगण्यावरून मला आत्मविश्वास येतो किंवा परत एकदा विचार करायचा का, याची एक उणीव होते.

जेव्हा मी फँड्री लिहिला त्यावेळेस गार्गी एकटीच होती, तिला कायम पटकथेतलं कळायचं, यामुळे मी गार्गीलाच पटकथा लिहून ऐकवत असतो. गार्गीच्या कवितांचं कौतुक करत असताना नागराज म्हणाले की, ‘माझ्या सिनेमाच्या कथेची प्रोग्रेस बघणारी गार्गी आहे. गार्गीची साहित्य आणि कलेची समज खूप चांगली आहे. ती खूप चांगली कविता लिहित असते. मी कविता लिहून तिला पाठवातो, परंतु ती माझ्यापेक्षा चांगलं लिहिते असं तिला कधीच वाटायचं नाही. तिच्या खूप साऱ्या कविता छापून आल्या आहेत. तिने मोजकं लिहिलं, ती फार लिहित नाही, परंतु खूप छान लिहित असते.

Utkarsh Shinde: पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट; म्हणाला, ‘आजची पिढी…’

आता एकत्र जगतोय ते तर आहेच. कुतूब, गार्गी, प्रियांका ही माझी कायमची टीम आहे. कुतूब एडिटिंग करत असतो. माझ्या डोक्यामध्ये जेव्हा एखादा सिनेमा करायचं चालू असतं, त्यावेळेस गार्गी कुतूबचं म्हणणं असतं की तू हे कर, ते नको करू. अनेकदा ते डोळे झाकून विश्वास ठेवावं असं असतं. गार्गी हे कायम प्रोड्युसरची धुरा सांभाळते. यामुळे माझे व्यवहार तिच सांभाळत असते. परंतु मी जे क्रिएटीव्ह करतो, त्यात तिचा खूप मोठा वाटा असतो. ती माझा आरसा आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Tags

follow us