Utkarsh Shinde: पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट; म्हणाला, ‘आजची पिढी…’

Utkarsh Shinde: पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट; म्हणाला, ‘आजची पिढी…’

Utkarsh Shinde Post: देशात सर्वत्रच सध्या दिवाळीचा (Diwali 2023) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यावर्षी दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. दिवाळीत अनेक ठिकाणी किल्ले बनवण्याच्या स्पर्धा देखील घेतले जात आहेत. घराच्या बाहेर देखील किल्ले बनवत महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपली जाते. गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) देखील आपल्या पुतणीसोबत दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. सोबतच त्याने सविस्तर पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमधून उत्कर्षने (Utkarsh Shinde) महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यामुळे सध्या त्याच्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)


उत्कर्ष शिंदेची पोस्ट…

“मातीत कस राहिला नाही तर पीक कसदार येत नाही”
आजची पिढी संस्कृती विसरत चाललीये असं कैक लोक सरास म्हणताना ऐकू येतात. पण, त्यातले किती जण तीच पिढी घडविण्यासाठी आपला वेळ देतात? किती जण लहान मुलांच्या प्रश्नांना शांतपणे बालिश न म्हणता समजूतदार पणे उत्तर देतात? आणि किती जण मीच खूप व्यस्त असतो हे उत्तर देऊन पळ काढण्यापेक्षा त्या लहानग्या मुलांना संस्कार घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात? हातात मोबाईल दिला आणि आपल्या मागची किटकिट संपली असा मानणाऱ्यांनो. हे लक्षात ठेवा. “मातीत कस राहिला नाही ना तर पीक कसदार येत नाही” महाराष्ट्र हे सणांचा संस्कृतीने नटलेलं राज्य आहे.

लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या सण-उत्सवाची ओढ असते. या उत्सवादरम्यानच्या, अनेक प्रथा-परंपरा प्रचलित आहे. लहान मुलांसाठी तर हा सण आनंदाच्या पर्वणीपेक्षा कमी नाही. दीपदानोत्सव असो की दीपावली की पाडवा. या सर्व गोष्टींची माहिती देऊन या ओल्या मातीला आकार देऊन सुंदर मूर्ती घडविण्याचं काम आपलं नाही का? या सणात किल्ले तयार करण्याची आपल्या महाराजांची आपल्या मावळ्यांची शौर्य गाथा सांगून या आधुनिक पिढीत ‘क्रेझ’ आपण निर्माण नाही करायची का? की स्पायडर मॅन, आयर्न मॅन हेच त्यांच्या मनावर बिंबवू द्यायचं? आपल्या पूर्वजांनी केलेला इतिहास न वाचता न समजून घेता नवा इतिहास या नव्या पिढ्यांना घडवता येईल का?

काल माझी पुतणी अंतरा आदर्श शिंदेबरोबर गावी किल्ला सजावट करत बरंच काही चर्चा करत तिला शिकवता आलं. आमच्या शिंदेशाही परिवारात थोर पुरुषांचे विचार वाचून त्यावर विज्ञानवादी चर्चा करण्यावर जास्त भर दिला जातो. आणि मी घरी असलो की मैदानी खेळ क्रिकेट, पकडा पकडी, ट्रेकिंग, मुलांबरोबर डान्स, फायटिंग टास्क, ड्रॉईंग, पेंटिंग मस्ती सुरू राहते. आपली एनर्जी डबल होतेच पण त्यांना ही त्यांचं लहानपण छान एन्जॉय करता येतं. आपली पिढी हसत खेळत मज्जा करत वाढू द्या. आज या बालदिना निमित्ताने आपली पिढी विज्ञानवादी घडवूया. लक्षात ठेवा. “पीढ़ियां पढ़ेगी तभी आगे बढ़ेगा”

Prasad Oak: ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण, प्रसाद ओक पोस्ट करत म्हणाला,’….अखेर प्रवास

उत्कर्षची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठया प्रमाणात कमेंटही केल्या आहेत. उत्कर्ष पेशाने डॉक्टर आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्येही तो सहभागी झाला होता. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या मुख्य भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube