Nana Patekar: अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वादग्रस्त व्यक्तामुळे कामय चर्चेत येत असतात. नुकताच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाबद्दल वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधले होते. ( Social media) त्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने प्रत्युत्तर देत नाराजी व्यक्त केली होती. आता यावर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया नसीरुद्दीन शाहाला चांगलच सुनावलं आहे.
नाना पाटेकर यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान नसीर यांच्या वक्तव्यावर मत मांडत खोचक टोला लगावला आहे. “तुम्ही नसीर यांना विचारले होते का की, त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे काय? माझ्या मते, राष्ट्रावर प्रेम दाखवणे हा राष्ट्रवाद आहे आणि ती वाईट गोष्ट नाही. गदर हा सिनेमा ज्या प्रकारचा आहे. त्यामध्ये तसा आशय असेल आणि ‘द केरला स्टोरी’ बघितला नाही. यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही,” असे नाना यावेळी म्हणाले आहेत.
तसेच पुढे ते म्हणाले, ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांनी पैसे कमावणे योग्य नसल्यचे त्यांनी यावेळी सुनावलं आहे. सत्य घटनांवर सिनेमा बनवत असताना त्यांनी वस्तुस्थिती लक्षामध्ये ठेवली पाहिजे. नाना पाटेकर यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या सिनेमात ते कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा सिनेमा २८ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्तीच स्वप्न साकार;‘जवानच्या डायलॉगची जोरदार चर्चा
तसेच मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे सिनेमा बघितले नाही. परंतु त्यामध्ये नेमके काय दाखवले जात आहे, ते मला चांगलेच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक गोष्ट आहे की, ‘द काश्मीर फाइल्स’सारखे सिनेमा हिट होत आहेत. परंतु सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांचे सिनेमा चाहते बघत नाही. यामुळे या दिग्दर्शकांनी या गोष्टींमुळे न डगमगता त्यांचे सिनेमा चाहत्यासमोर आणायला पाहिजेत असे वाटते असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडला आहे.