Download App

Nana Patekar: नाना पाटेकरांनी चाहत्याला भर रस्त्यात लगावली, व्हिडीओ व्हायरल

Nana Patekar Video Viral: बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ (shooting) बनारसचा आहे. या ठिकाणी त्यांनी एका चाहत्याला जोरदार थप्पड लगावली आहे. (Video Viral) त्या चाहत्याला नाना पाटेकरांसोबत सेल्फी घ्यायचा होता. त्यावेळी नाना पाटेकर आगामी सिनेमाचं शुटिंग करत होते, अशी माहिती मिळत आहे. नाना पाटेकरांच्या शुटिंग दरम्यान हा चाहता समोर आला आणि फोटो क्लिक करु लागला त्यावेळेस नाना पाटेकरांना त्याला जोरदार थप्पड लगावून दिली आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांना कायम राग येतो. अनेकवेळा ते त्यांच्या रागीट स्वभावासाठी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये सर्वश्रूत आहेत. तसेच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका चाहत्याला जोरदार थप्पड लगावली आहे. आणि रागाने त्याच्यावर ओरडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नाना पाटेकर ‘गदर 2’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासोबत ‘जर्नी’ या सिनेमात बघायला मिळणार आहेत. यामध्ये अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्ष देखील असणार आहे. या सिनेमाची कथा डिमेन्शियाने ग्रस्त वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यातील नात्याभोवती कथा फिरत आहे. नाना पाटेकर सध्या वाराणसीमध्ये त्यांच्या या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. यावेळी एक चाहता तिथे सेल्फीसाठी येत असतो. शूटिंग चालू असताना त्याने सेल्फीसाठी शॉटमध्ये अचानक आणल्याने ते चिडले. त्यांचा राग अनावर झाला. आणि त्याच्या डोक्यावर जोरदार थप्पड लगावली. तसेच त्याला तिथून निघून जायला सांगितलं आहे.

Nagraj Manjule: ‘नागराज मंजुळेंचा बायकोबद्दल वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ‘पहिली भेट आम्ही…’

नाना पाटेकरांचा द व्हॅक्सिन वॉर सिनेमा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु या सिनेमाला चाहत्यांनी नाकारलं आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा सिनेमा कोरोना काळात शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या स्वदेशी लस निर्मितीवर आधारित होता.

Tags

follow us