Mulund Viral Video : तृप्ती देवरूखकरांकडून शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंची भेट; राज ठाकरेंचाही ट्विट करत पाठिंबा

Mulund Viral Video : तृप्ती देवरूखकरांकडून शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंची भेट; राज ठाकरेंचाही ट्विट करत पाठिंबा

Mulund Viral Video : मुंबईतील मुलुंड (Mulund Viral Video) भागात शिवसदन इमारतीच्या सचिवांनी एका मराठी दाम्पत्याला घर नाकारल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. यामध्ये तृप्ती देवरूखकर -एकबोटे या महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढले होते. त्यानंतर या महिलेच्या मदतीला मनसे धावून आली आहे. तसेच या महिलेने राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर राज ठाकरे यांनी या महिलेच्या प्रकरणार ट्विट देखील केले.

Salaar: प्रभासच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तृप्ती देवरूखकर-एकबोटेंनी घेतली शर्मिला ठाकरेंची भेट…

मुलुंड भागात (Mulund Viral Video ) घर नाकारलेल्या महिलेने राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी रागाच्या भरात तो व्हीडिओ पोस्ट केला. तेव्हा मला पहिल्यांदा मनसेने मदत केली. त्यासाठी मला मनसेचे आभार मानायचे होते. म्हणून मी शर्मिला ठाकरेंची भेट घेतली. शर्मिला यांनी माझं ही हिंमत दाखवल्याबद्दल अभिनंदन केलं.

मुलगा गेलाय म्हणत डीजे लावण्यास रोखलं; टोळक्याची कुटुंबाला बेदम मारहाण

त्याच बरोबर त्या यावेळी म्हटल्या की, त्या इमारतीमध्ये मी जी जागा बघायला गेले होते. ती जागा मला द्यायला इमारतीतील इतर लोक आणि जागा मालकांना काही समस्या नव्हती. पण तेथील सचिवांनी मला मी मराठी असल्याने मला जागा द्यायला नकार दिला. मात्र त्यानंतर हा प्रकार जेव्हा संबंधित जागा मालकांना कळविण्यात आला. तेव्हा त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा प्रकार सोसायटीच्या कमिटीमध्ये मांडू असं अश्वासन मला दिलं. तेसच या सचिवांना सोसायटीच्या सचिव पदावरून काढण्यात आलं आहे. असं देखील यावेळी तृप्ती देवरूखकर-एकबोटे यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी देखील केले ट्विट…

दरम्यान राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर ट्विट करत मनसेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. तसेच अन्याय दिसेल तिथे लाथ बसलीच पाहिजे असं ते म्हणाले आहेत. ‘मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे ! ‘ असं ट्विट राज यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube