Salaar: प्रभासच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Prabhas New Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. प्रभासच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. (Social media) बहुप्रतिक्षित आगामी ‘सालार’ सिनेमाची नवीन प्रदर्शित तारीख अखेर समोर आली आहे. आता २२ डिसेंबर २०२३ दिवशी प्रभास चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे.
𝐂𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐁𝐥𝐨𝐨𝐝𝐲 𝐒𝐨𝐨𝐧!#SalaarCeaseFire Worldwide Release On Dec 22, 2023.#Salaar #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @hombalefilms #VijayKiragandur @IamJagguBhai @sriyareddy @bhuvangowda84 @RaviBasrur @shivakumarart @vchalapathi_art @anbariv… pic.twitter.com/IU2A7Pvbzw
— Hombale Films (@hombalefilms) September 29, 2023
या सिनेमाच्या घोषणेपासून याबद्दल चाहत्यांच्या मनामध्ये मोठी उत्सुकता लागली होती. याअगोदर हा सिनेमा २८ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित होणार होता. परंतु या सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ‘सालार भाग१ आणि सीझफायर’ हे सिनेमे २२ डिसेंबर २०२३ दिवशी जगभरात प्रदर्शित होणार आहे. होम्बले फिल्म्सने ट्विट करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
तसेच तारीख फिक्स होण्याच्या अगोदर ‘सालार’ २२ डिसेंबर दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता निश्चित झाल्याचे बघायला मिळत आहे. ‘सालार’ हा सिनेमा ३ भाषेत प्रदर्शित होणार आहे. तामिळ, कन्नड हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नील याने सांभाळली आहे. तसेच त्याने अगोदर ‘केजीएफ चॅप्टर 1’ आणि ‘केजीएफ चॅप्टर 2’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे दिग्दर्शन केल्याचे बघायला मिळाले होते आहे.
Priya Bapat: प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाली…
प्रभासच्या ‘सालार’मध्ये KGF चा रॉकी भाई म्हणजे यशचा ५ मिनिटांची कॅमिओ बघायला मिळणार आहे. परंतु याबद्दल निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’च्या या दोन सिनेमाच्या यशानंतर साऊथचा ‘रेबल स्टार’ प्रभासची चांगलीच लोकप्रियता वाढली होती. परंतु ‘बाहुबली’नंतर प्रभासचे सर्वच सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याचे बघायला मिळाले आहे. यामुळे आगामी ‘सालार’ या सिनेमाकडून अभिनेत्याला खूप अपेक्षा असल्याचे दिसत आहेत.