मरताना माझा गैरसमज होऊ नये… अंत्यसंस्काराबाबत नाना पाटेकरांची अखेरची इच्छा! VIDEO पाहून डोळे पाणावतील

Nana Patekar यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर कशापद्धतीने अंत्यसंस्कार करायचे हे देखील सांगून ठेवलेले आहे.

Nana Patekar

Nana Patekar

Nana Patekar’s final wish regarding his last rites video will bring tears to eyes : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे आज (8 ऑक्टोबर) वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी पहाटे गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्र आणि देशभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

Drought Inspect : दुष्काळी परिस्थितीची केंद्राकडून पाहणी; शुक्रवारी पथक अहिल्यानगर जिल्ह्यात

तसेच त्यांच्या विविध आठवणींना सर्वच क्षेत्रातून उजाळा दिला जात आहे. यामध्ये आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी मृत्यूनंतर त्यांच्यावर कशापद्धतीने अंत्यसंस्कार करायचे हे देखील सांगून ठेवलेले आहे. हा व्हिडीओ ऐकून प्रत्येकाला त्यांच्यातील निसर्गाची काळजी असणारा एक दक्ष नागरीक दिसून येतो आणि डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही.

‘पीएचडी म्हणजे नोकरीची हमी नाही’, कौशल्याधारित शिक्षणावर भर देत सतीश चव्हाणांचा तरुणांना सल्ला

उद्या मी जाणार आहे हे मला माहिती आहे. त्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करायला 12 मण लाकडं लागणरा आहेत. हेही मला माहिती आहे. जी माझी शेवटीची संपत्ती असेल. बेटा मी ती माझी लाकडं जमा करून ठेवलेली आहेत. जी वाळलेली आहेत. ओली लाकडं वापरू नका. नाही तर धूर होईल आणि अंत्यसंस्काराला आलेल्या मित्र परिवाराच्या डोळ्यात तो जाऊन पाणी येईल. त्यामुळे मरताना माझा गैरसमज होईल की, माझ्यासाठी रडत आहेत. कमीत कमी मरताना तरी माझा कोणताही गैरसमज होता कामा नये.

दरम्यान हा व्हिडीओ तसेच ज्या नाम फाँडेशनची स्थापना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केली होती. त्याचे सीईओ गणेश थोरात यांनी देखील या व्हिडीओचा उल्लेख करत सांगितलं की, हे खर आहे की, नाना पाटेकरांनी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणती लाकडं वापरायचीी हे सांगून ठेवलं होतं. तसेच मला माझ्या शेतात माझे अंत्यसंस्कार कला मला त्या मातीत राहू द्या, त्या मातीत मिसळा. असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितल्या प्रमाणेच त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. असं गणेश थोरात यांनी सांगितलं.

Exit mobile version