मुंबई : आज चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांची पुण्यतिथी आहे. मीना कुमारी यांना जाऊन आज 51 वर्ष झाले. पण आजही त्यांच्या चित्रपटांची चर्चा कुठे ना कुठे सुरूच असते. त्याकाळी मीना कुमारी चित्रपटांच्या हिरॉईन नाही तर हिरोच असायच्या. त्यामुळे अभिनेते त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास घाबरत की, मीना कुमारींमुळे आपली भूमिका फिकी ना वाटो.
मीना कुमारी यांचं रिल लाईफ आणि अभिनाच्या त्याकाळी देखील तेवढ्याचं चर्चा होत्या जेव्हा सोशल मिडाया देखील नव्हता. असं म्हटल जायचं की, त्या एखाद्या राणीप्रमाणे जीवन जगत होत्या. रोज गुलाबाच्या बिछान्यावर त्या झोपत. फिरण्यासाठी इंपाला कारचा वापर करत. जी कार त्याकाळी खूप प्रतिष्ठेचं लक्षणं मानलं जात होतं. दिलीप कुमार, मधुबालासारखे दिग्गज त्यांचे चाहते होते.
दुसरीकडे मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत दुःखाने भरलेलं होतं. लहानपणीच त्यांना त्यांच्या वडिलांनी अनाथ आश्रमात सोडलं होत. पुढे पती कमाल अमरोहीच्या अत्याचारांमुळे त्या व्यसनांच्या आधीन गेल्या. त्यांमुळे असं म्हटलं जायचं की, त्यांचं वैयक्तिक आयुष्य इतक दुःखाने भरलेलं होतं. त्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये रडण्याच्या सीनसाठी ग्लिसरिन वापरण्याची गरज पडत नव्हती.
या दरम्यान मीना कुमारीच्या मृत्यूनंतर अभिनेत्री नरगिस यांच्या ‘मौत मुबारक हो’ या लेखाची चर्चा झाली होती. याचं झालं असं होत की, चुप रहूंगी या चित्रपटाचं शूटींग सुरू असताना नरगिस आणि मीना कुमारीची रूम शेजारी-शेजारीच होत्या. एक दिवस नरगिसने मीनाच्या रूममधून ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर कमाल मीनाच्या खोलीतून बाहेर पडताना दिसले. दुसऱ्यादिवशी मीना कुमारी चेहरा खराब झालेला होता. त्यानंतर मीना कुमारींच्या आयुष्यातील दुःख माहीत झाले होते.
Bholaa Box Office Collection: ‘भोला’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले 11.50 कोटी
त्यामुळेच मीना कुमारी यांच्या निधनानंतर नरगिसने उर्दू मॅगझीनसाठी एक कॉलम लिहिला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती. ‘मीना, तुम्हें मौत मुबारक हो. मी असं पहिले असं कधी नाही म्हणाले पण तुला मी तुझ्या मृत्यूच्या शुभेच्छा देत आहे. तसेच आता या जगात पुन्हा येऊ नको. हे जग तुझ्यासारख्यांसाठी चांगले नाही.