Bholaa Box Office Collection: ‘भोला’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले 11.50 कोटी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 31T104725.081

Bholaa Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगण (Ajay Devgn) हा आयकॉनिक अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय देवगण गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. अजयच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. मागील वर्षी रिलीज झालेल्या अजय देवगणचा दृष्यम-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता त्याचा भोला (Bholaa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

‘भोला’ हा चित्रपट काल (30 मार्च) रिलीज झाला आहे . भोला या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. भोला या चित्रपटानं रिलीज झाल्यावर पहिल्या दिवशी 11.50 कोटी एवढी कमाई केली. अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. यामुळे भोला या चित्रपटानं दृष्यम-2 या चित्रपटाचं ग्रँड ओपनिंग-रेकॉर्ड तोडू शकला नाही. पण वीकेंडला भोला चित्रपट मोठी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.

Nawazuddin Siddiqui आणि पूर्व पत्नी आलियाला न्यायालयाकडून कोर्टात हजर राहण्याचे आदेश; ‘हे’ आहे कारण

भोला चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव यांनी मुख्य भूमिका साकारली. अजयचा भोला देशभरातील ४००० स्क्रिनवर प्रदर्शित झाला आहे. तामिळ सिनेमा ‘कैथी’चा रिमेक असणारा भोला अभिनेता अजय देवगणनेच दिग्दर्शित केला आहे. भारतात हा सिनेमा २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. तर आता भोला हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे देवगण आणि तब्बूच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. शाहरुखच्या ‘पठाण’नंतर आता बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या ‘भोला’चा सर्वत्र गाजावाजा पाहायला मिळत आहे.

Tags

follow us