Narayana Murthy on Kareena Kapoor : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) बद्दलचा एक प्रसंग सांगितला. करीना कपूरने तिच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष केलं असं ते म्हणाले. एकदा ते ज्या विमानातून प्रवास करत होते, त्याच विमानात करीनाही प्रवास करत होती. नारायण मूर्ती यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ जुना आहे. पण सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती एका कार्यक्रमात लोकांशी संवाद साधत आहेत. यावेळी नारायण मूर्ती यांनी करीना कपूरवर टीका केली. (Narayana Murthy on Kareena Kapoor told story how kareene behave fans)
नारायण मूर्ती म्हणाले, एकदा मी लंडनहून परतत होतो. तेव्हा माझ्या शेजारच्या सीटवर करीना कपूर बसली होती. विमानातील अनेक लोक तिच्याजवळ येऊन तिला हॅलो म्हणत होते. पण करिना त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. ती त्यांना काहीच उत्तर देत नव्हती. हे पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्याजवळ जे लोक आले, त्यांच्यासाठी मी उभा राहिलो,त्यांच्याशी अर्धा-एक मिनीट बोललो. त्या चाहत्यांची फक्त एवढीच अपेक्षा असते, असं मूर्ती म्हणाले.
करीना कपूर चाहत्यांशी कशी वागली? नारायण मूर्तींनी सांगितला किस्सा
हे ऐकल्यानंतर सुधा मूर्ती म्हणतात की, करिनाचे लाखो चाहते आहेत, त्यामुळे कदाचित ती थकली असेल. मूर्ती हे संस्थापक आहेत, अशा व्यक्तीचे क्वचितच दहा हजार चाहते असतील. पण एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे लाखो चाहते असतात.
पत्नीचे उत्तर ऐकल्यानंतर नारायण मूर्ती म्हणाले, “ही खरी समस्या नाही. मुद्दा असा आहे की, जेव्हा कोणी प्रेम दाखवते तेव्हा तुम्ही त्याच्याशी त्याच प्रेमाने वागू शकता. तुमची पद्धत वेगळी असू शकते. मात्र, हे फार महत्वाचे आहे. तुमचा अहंकार नष्ट करण्याचे हे सर्व मार्ग आहेत, दुसरे काही नाही.”
दोन महिन्यांपूर्वी करीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ती एअरपोर्टवर एका चाहत्याकडे दुर्लक्ष करताना स्पष्ट दिसत आहे. तिची ही वागणूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला. हा खूपच उद्धटपणा आहे. तिला फक्त सेल्फी घ्यायचा होता. पण या बॉलीवूड कलाकारांना एवढा कसला अॅटीट्यूड आहे, असं एका युजरने लिहिलं होतं.