Download App

Nargis Fakhri: री-रिलीजला प्रचंड प्रतिसाद मिळताच अभिनेत्री म्हणाली, ‘मी पुन्हा बॉलिवुडमध्ये…’

Nargis Fakhri On Rockstar Re-Release: प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.

Nargis Fakhri On Rockstar Re-Release: प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. ‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) या सिनेमातून नर्गिसने कलाविश्वात पदार्पण केलं. बऱ्याचदा ही अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षा स्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते. परंतु, यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आता चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद यावर प्रतिक्रिया देताना नर्गिस फाखरी उर्फ ​​रॉकस्टार हीरने खास भावना व्यक्त केल्या.


या चित्रपटाला चित्रपट गृहात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे, यावर प्रतिक्रिया देताना नर्गिस फाखरी उर्फ ​​रॉकस्टार हीरने खास भावना व्यक्त केल्या आहेत.याबद्दल बोलताना नर्गिस म्हणाली की, ‘चाहत्यांच्या उदंड प्रतिसादाबद्दल मला खूप आनंद होतोय. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला माझा चित्रपट तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांनंतर 1.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

खरं तर 14 दिवसांत हा चित्रपट 1 लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. रॉकस्टारच्या पुन्हा रिलीजला मिळालेल्या प्रतिसादाने मी खूप भावूक झाली आहे आजही प्रेक्षकांनी तितकच प्रेम दिलं आहे. 12 वर्षांनंतर देखील लोकांचा या चित्रपटाला प्रतिसाद पाहून हे पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये पदार्पण झाल्यासारख वाटत. जेव्हा आम्ही चित्रपटावर काम करत होतो, तेव्हा आम्हाला माहित नव्हते की आम्ही एक कल्ट क्लासिक बनवत आहोत.

Ayushmann Khurrana: ‘ड्रीम गर्ल 2’ च्या यशानंतर अभिनेत्याची ‘या’ ब्रँडसाठी पहिली पसंती

पुढे म्हणाली की, मी अशा चित्रपटाचा एक भाग आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. ‘इम्तियाज अली’ या चित्रपटाने खूप प्रेम मिळवलं आहे या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने हे सिद्ध केले आहे. 69 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारा हा चित्रपट आजही तितकाच तरुण आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही, अशा भावना नर्गिस फाखरी उर्फ ​​रॉकस्टार हीरने व्यक्त केल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज