जागतिक नृत्य दिवस आणि ‘रॉकस्टार’ मधील डान्सचा अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली, “त्या क्षणी…”
Nargis Fakhri: नरगिस फाखरी (Nargis Fakhri) ही बॉलिवूडच्या (Bollywood) सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (Hindi cinema) या चित्रपटातील नर्गिसच्या अभिनयाची खूप प्रशंसा मिळाली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ती रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. दरम्यान, आता अभिनेत्रीने एक मुलाखत दिली आहे.
ज्यामध्ये तिने जागतिक नृत्य दिवस आणि ‘रॉकस्टार’ मधल्या डान्सचा अनुभव शेयर केला आहे. अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत चित्रपटांच्या वेगळ्या निवडीसह प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे पण अभिनयाच्या पलीकडे अभिनेत्रीने तिच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये तिच्या डान्स मूव्हने सर्वांना थक्क केले आहे. तिची यार ना मिले, गलत बात है, ओये ओये आणि अधिक सारख्या लोकप्रिय गाण्यांनी केवळ संगीत लायब्ररीवरच राज्य केले नाही तर आजही ती प्रेक्षकांच्या मनात आहे.
जागतिक नृत्य दिनानिमित्त नर्गिस फाखरी हिने तिची एक खास आठवण शेयर केली आहे. याबद्दल बोलताना नर्गिस म्हणाली की, “मला ठाम विश्वास आहे की नृत्य हा पडद्यावरील अभिव्यक्तीच्या सर्वोत्तम प्रकारांपैकी एक आहे. माझ्यासाठी नृत्य म्हणजे एक प्रकारच ध्यान आहे आणि नृत्यातून ताण विसरते. ‘रॉकस्टार’ करताना मी खूप घाबरले होते पण एकदा संगीत वाजले की मी थांबू शकले नाही.
बॅक-टू-बॅक 34 सिनेमे फ्लॉप; अखेर अक्षयच्या ‘वेलकम टू जंगल’मध्ये अभिनेता बनणार सुपरस्टार
दरम्यान वर्क फ्रंटवर, नर्गिस फाखरी शेवटची ‘ततलुबाज’मध्ये दिसली होती. अभिनेत्रीकडे तिच्या मार्गावर येत असलेल्या प्रकल्पांची एक रोमांचक लाइनअप आहे, जी ती या वर्षाच्या शेवटी जाहीर करणार असल्याची माहिती सांगितली आहे.