Download App

Nargis Fakhri: गणेश चतुर्थी निमित्त नर्गिस फाखरीने शेयर केल्या खास आठवणी; म्हणाली, ‘गणपती…’

Nargis Fakhri Post : भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. घरोघरी गणरायाचे आगमन होईल. सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. (Social media) महाराष्ट्रासह देशभरात हा सण साजरा केला जातो. यामुळे सर्वत्र भक्तीमय, मंगलमय, आनंदी, उत्साही वातावरण असते. (Ganesh festival 2023) गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पुढील काही दिवस भारावलेले असतात. आणि सध्या सगळेच कलाकार या अनोख्या उत्सवात रमले असताना एकीकडे रॉकस्टार आणि मद्रास कॅफे सारख्या सिनेमामध्ये अप्रतिम अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नर्गिस फाखरीने (Nargis Fakhri ) मुंबईच्या गणपती उत्सवाच्या भव्यतेबद्दल खास आठवण शेयर केली आहे.


तिने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मुंबई आणि इथला गणेश उत्सव हा प्रेमळ असतो ” अस म्हणत तिने बाप्पाच्या आठवणी ना उजाळा दिला आहे. गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांचा भाग होण्यापासून ते गणपती उत्सवाचा एक भाग होण्यापर्यंत नर्गिस या बद्दल खास आठवणी लिहिले आहे. तिने तिच्या पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे: “मुंबईचे हृदय गणपतीच्या उत्सवाच्या तालात धडधडते, आणि मला खूप मस्त वाटत आहे. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…”

मुंबईच्या गणपती उत्सवाशी नर्गिसच असलेलं नातं हे तिच्या पोस्टमधून बघायला मिळत असते. जरी ती मैल दूर असली तरी तिचं प्रेम आणि उत्सवांच्या प्रेमळ आठवणी तिला आजही तिची खूप आवड असलेल्या शहराच्या हृदयाच्या जवळ असल्याचे बघायला मिळत आहे.

Kangana Ranaut : ‘इंडिया आघाडी’ला भ्रष्टाचारी गँग, कंगना राणौतचा हल्लाबोल

कोण आहे नर्गिस फाखरी?

नर्गिस फाखरी ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे, ती भारतीय मनोरंजन क्षेत्रात काम करते. हिंदी सिनेमातील तिची पहिली भूमिका 2011 च्या रोमँटिक ड्रामा रॉकस्टारमध्ये होती. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. त्यानंतर तिने पॉलिटिकल थ्रिलर मद्रास कॅफे (2013) मध्ये वॉर जर्नालिस्टची भूमिका केली आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कॉमेडी सिनेमा मैं तेरा हिरो (2014), स्पाय (2015 हॉलीवूड) आणि हाउसफुल 3 (2016) मध्ये काम केले आहे.

Tags

follow us