Nargis Fakhri : मला ‘या’ दिग्दर्शकांसोबत काम करायचंय; नर्गिसने व्यक्त केली इच्छा…

मला आता संदीप रेड्डी वंगा, कबीर खान आणि राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अभिनेत्री नर्गिस फाखरीने व्यक्त केलीयं.

Nurgis Fakhri

Nurgis Fakhri

Nargis Fakhri : इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’मधून पदार्पण करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरीने (Nargis Fakhri) एक इच्छा व्यक्त करुन दाखवलीयं. मला आता संदीप रेड्डी वंगा, कबीर खान आणि राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केलीयं. याआधी तिने डेव्हिड धवन (मैं तेरा हिरो), शूजित सिरकार (मद्रास कॅफे) आणि रोहित धवन (डिशूम) यांसारख्या बॉलिवूडमधील काही दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलंय.

नर्गिस फाखरी पुढे बोलताना म्हणाली, मला पुढील काळात संदीप रेड्डा वंगा, राजकुमार हिरानी, कबीर खान यांच्यासोबत काम करायचं आहे. मला ‘ॲनिमल’ चित्रपटातील रणबीर कपूरचं पात्र ज्या पद्धतीने तयार केलं गेलं ते आवडलं असून चित्रपटातील प्रत्येक सीन उत्तम शूट करून तो प्रेक्षकांना मोहित करणारा ठरलायं, त्यामुळेच हा चित्रपट सुपरहिट ठरला असल्याचं नर्गिसने स्पष्ट केलंय.

Dhadak 2 : सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा ‘धडक 2’ कधी रिलीज होणार? चित्रपटाच्या रिलीजची घोषणा

तसेच राजकुमार हिरानीचे ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘संजू’ सारखे चित्रपट मला भावले असून हे चित्रपट हलक्या-फुलक्या क्षणांनी भरलेले आहेत. त्यांचे चित्रपट ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या मनाला भिडतात, ही बाब नक्कीच प्रशंसनीय आहे. शेवटी मला कबीर खान आणि ‘एक था टायगर’ सारख्या उच्च-ॲक्शन चित्रपटांबद्दलचा विचार करणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करायचं असल्याचंही नर्गिस फाखरीने सांगितलं आहे.

दरम्यान, नर्गिस फाखरीने केलेल्या खुसाश्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली असून नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती. आता नर्गिस आगामी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी तयारी करत असून या प्रोजेक्टची वर्षअखेरीस घोषणा करण्यात येणार आहे.

Exit mobile version