Nargis Fakhri: ‘मी अभिनेत्री झाले नसते तर…’, नर्गिस फाखरीने केला मोठा खुलासा
Nargis Fakhri: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी कमावली होती. प्रत्येकजण नर्गिसच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. (Social media) पहिल्या चित्रपटात नर्गिसने बोल्ड दृश्ये देणेही टाळले नाही. ‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) या पहिल्याच चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार बनवले होते. पण अभिनेत्रीचा हा स्टारडम फार काळ टिकू शकला नाही. वेगवेगळ्या भूमिका करून अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध केलं आहे.
अभिनेत्री बॉलीवूडमध्ये (Bollywood) येण्यापूर्वी तिच्यासाठी करिअरची वेगळी निवड कोणती होती हे अभिनेत्रीने उघड केले आहे. म्हणाली की, “मला लहानपणीच पशुवैद्य बनायचे होते. माझं प्राण्यांवरच प्रेम आणि माझ्या लहानपणापासूनच त्यांचा सोबतच नात हे सुंदर आहे पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत आणि मी चित्रपटसृष्टीत आले. चित्रपसृष्टीत आले नसते तर नक्कीच मी पशुवैदयकीय शिक्षण घेऊन या विश्वात काहीतरी केलं असतं.
वैविध्यूर्ण भूमिका साकारून आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मला मिळाली आहे तर कायम प्रेक्षकांना काय मोहित करून जाईल याकडे माझा कल आहे. अलीकडेच ‘मैं तेरा हिरो’ रिलीज होऊन 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे नर्गिस फाखरीने जुन्या आठवणी ना उजाळा दिला. वर्कफ्रंटवर नर्गिस शेवटची ‘ततलुबाज’ मध्ये दिसली होती आगामी काळात तिच्याकडे अनेक मनोरंजक प्रकल्प येत आहेत ज्यांची घोषणा या वर्षाच्या शेवटी होणार आहे.
Amhi Jarange: ‘आम्ही जरांगे…’मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
नर्गिसच्या लिंकअपची चर्चा
पहिल्याच सिनेमात को-स्टार रणबीर कपूर याच्याशी तिच्या लिंकअपची चर्चाही समोर आली होती. मात्र, नंतर दोघांनीही यातून माघार घेतली. यानंतर अभिनेता उदय चोप्रावर नर्गिस फिदा झाली होती. या दोघांनीही कधीही उघडपणे आपलं नातं स्वीकारलं नाही, मात्र अशी चर्चा आहे की दोघांनी एकमेकांना जवळपास 2 वर्ष डेट केलं होतं. आणि नंतर या दोघांचा अचानक ब्रेकअप झाला. असे सांगितलं जाते की, उदयने व्हॉट्सअॅपवरच नर्गिससोबत ब्रेकअप केला होता.