National Poster Design Competition on Future-Shaping Projects Extended : देशवासीयांचे भविष्य घडविणाऱ्या कल्याणकारी योजना, अभियान, उपक्रमावर आधारित राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा भरविण्यात आली असून www.pmvision2art.com या संकेतस्थळावर 21 ऑक्टोबरपर्यंत पोस्टर अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे. स्पर्धकांनी ए2 आकारातील पोस्टर पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी (हाय-रेझोल्यूशन) मध्ये हे पोस्टर अपलोड करायचे आहेत.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची ‘टर्न व्हिजन इनटू आर्ट : डिझाइन द पोस्टर, सेलिब्रेट द डिकेड‘ अशी थीम ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावरच नागरिकांच्या खिशाला झळ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय
मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, वेव्ह्ज समिट, वातावरण बदल, योगा आदी विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत.
मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठंही नाही; नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
75 विजेत्यांना पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच त्यांची कलाकृती प्रमुख कला दालनांमध्ये प्रदर्शित केली जाईल. त्याचबरोबर विजेत्यांची कलाकृती एका विशेष कॉफी-टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात येईल. या स्पर्धेसाठी अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडियाचे विशेष सहकार्य लाभले आहे.