मुंबई : प्रसिद्ध संगीतकार एमएम किरवाणी (MM Keervaani)यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्ट (Bedrest)घेण्याचा सल्ला दिला आहे. एका ऑनलाईन मुलाखतीतून (Online Interview)त्यांनी ही माहिती दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये किरवाणींनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर (Oscar award)सोहळ्यात हजेरी लावली होती. त्यानंतर आता त्यांनी एक ऑनलाईन मुलाखत देत आपल्या तब्यतीची माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये सांगितले की, मला कोरोनाची लागण झालेली आहे. प्रवास आणि उत्साहाचा हा परिणाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपण डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेत आहे. त्यातच डॉक्टरांकडून बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
सुशीलकुमार शिंदेंना मोठा धक्का; धर्माण्णा सादुल यांचा कॉंग्रेसला गुडबाय
किरवाणी यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. याच पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरीमधील पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू गाणं आरआरआर या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्ररटातलं आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला देखील एमएम किरवाणी यांनी हजेरी लावली होती. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार नाटू नाटू या गाण्यानं पटकावला. किरवाणी यांनी तेलगू, तमिळ, कन्नड मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमधील अनेक गाण्यांचे संगित दिग्दर्शन केलं आहे.