Download App

Nawazuddin Siddiqui करणार अवनीत कौरशी रोमान्स; बहुचर्चित ‘टिकू वेड्स शेरू’चा ट्रेलर प्रदर्शित

Tiku Weds Sheru Trailer : नुकतचं कंगनाची निर्मिती असणारा ‘टीकू वेड्स शेरू’ सिनेमाचा (Tiku Weds Sheru Movie) ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदा सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात मोठं पाऊल उचल आहे. या सिनेमातमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) हा मुख्य भूमिकेमधून दिसून येणार आहे.

त्याच्याबरोबर अवनीत कौर देखील (Avneet Kaur) काम करत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमाची कथा लव्ह स्टोरीवर आधारित आहे. नवाजुद्दीन आणि अवनीत कौर यांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या हटके स्टाईलने अभिनयाची मोठी छाप टाकली आहे. तर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौरचा हा पहिला सिनेमा आहे.

‘टीकू वेड्स शेरू’या सिनेमाची कथा दोन टीकू आणि शेरू यांच्यावर आधारित असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. यामध्ये टीकूचं पात्र अवनीत कौर आणि शेरूचं पात्र नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारले आहे. शेरू मुंबईतील एक साधा ज्यूनिअर आर्टिस्ट आहे, आणि स्वत:ला सुपरस्टार समजत असतो. पुढे शेरूच्या लग्नासाठी मुलगी पाहायला जात असतात. या दरम्यान शेरूला टीकूच्या विवाहाचा प्रस्ताव समोर येतो. जी नेहमीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न बघत असते. फक्त मुंबईला जाण्यासाठी टीकू शेरूबरोबर लग्न करण्यासाठी तयार होते.

इतकच नव्हे, तर ती मुंबईमध्ये आल्यावर आपलं अभिनेत्री होण्याचे स्नप्न पूर्ण करण्यासाठी घरातून पळून जायचे ठरवते. यावरून तिला अभिनयाचे वेड किती आहे ते या सिनेमात दिसून येणार आहे. यापुढे सिनेमाची कथा विनोदी, रंजक पद्धतीने पुढे सरकत जाते आणि इंटरेस्टिंग वळण घेणार आहे. या सिनेमाची संपूर्ण कथा माहिती करून घेण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट चाहत्यांना बघावी लागणार आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

अवध्या 21 वर्षाची असणाऱ्या अवनीत कौरचा हा पहिला सिनेमा आहे. याअगोदर अवनीतने छोटया पडद्यावर काम केले आहे. तिने छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आत ती ‘टीकू वेड्स शेरू’ सिनेमातून चाहत्यांचे मने कसं जिंकते ते बघणं औत्सुक्याचे आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री अवनीत कौर सहज आणि आत्मविश्वाने वावरत असल्याचे दिसून येणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांचा ‘टीकू वेड्स शेरू’ फक्त मोठ्या पडद्यावरच नव्हे, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील लवकरच बघता येणार आहे. हा सिनेमा 23 जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडची क्विन आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना रनौतने या सिनेमची निर्मिती केली आहे.

 

Tags

follow us