Download App

Jawan Film Poster: नयनताराचा जवानमधील किलर लूक; पोस्टर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता

Jawan Film Poster: लवकरच अभिनेता किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खान (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसाअगोदर या सिनेमाचा प्रीव्यू (Movie preview) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. जवान या सिनेमाच्या प्रीव्यूमध्ये या सिनेमाची स्टार कास्ट दिसून आली आहे. तर काही साऊथ सिनेमासृष्टीतील कलाकार देखील ‘जवान’ या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे.

अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) ही देखील जवान या हटके सिनेमात महत्वाची भूमिका साकाणार असल्याची चर्चा आहे. जवान या सिनेमामधील नयनताराच्या लूकचा फोटो नुकताच किंग खानने शेअर केला आहे. नयनताराच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. किंग खाननं शेअर केलेल्या या फोटोमध्ये हातात बंदुक आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमध्ये नयनतारा दिसून आली आहे.

नयनताराच्या लूकचा फोटो शेअर करुन किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ती म्हणजे वादळापूर्वी होणारी मेघगर्जना आहे!’ किंग खानने शेअर केलेल्या नयनताराच्या या फोटोवर चाहत्यांनी देखील लाइक्स आणि कमेंट्सचा चांगलाच वर्षाव केला आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करुन नयनताराच्या लूकचं मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी किंग खानने त्याच्या जवान सिनेमामधील लूकचा फोटो शेअर केला आहे. किंग खानच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत किंग खान हा हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये दिसून आला आहे.

https://letsupp.com/entertainment/kiran-mane-social-media-post-viral-on-hollywood-actress-68645.html

जवान सिनेमामधील लूकचा फोटो शेअर करत किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जब मैं विलन बनता हूं ना तो मेरे सामने कोई भी हीरो टिक नहीं सकता!’ विजय सेतुपती देखील जवान या सिनेमामध्ये काम करणार आहे. तसेच दीपिका पादुकोण देखील या सिनेमात कॅमिओ रोलमध्ये दिसून येणार आहे. जवान हा हटके सिनेमा ७ सप्टेंबर दिवशी रिलीज होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जवान या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे.

Tags

follow us