NCW takes notice, summons issued to Nora Fatehi-Sanjay Dutt : सरके चुनर तेरी सरके या गाण्यावरून देशभरात वादाची ठिणगी पडली असून, या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय झाले आहे. गाण्यात अश्लीलता आणि अशोभनीयता असल्याच्या आरोपांची स्वतःहून दखल घेत आयोगाने अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता संजय दत्त, रकीब आलम, निर्माता व्यंकट के. नारायण आणि दिग्दर्शक किरण कुमार यांना समन्स बजावले आहेत.
एनसीसीडब्ल्यूच्या निवेदनानुसार संबंधित गाण्याचा आशय लैंगुकदृष्ट्या सूचक आणि आक्षेपार्ह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पॉस्को कायदा तरतुदींचे उल्लंघन झाल्याची शक्यता आयोगाने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम, 1990 अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने संबंधित कलाकार आणि निर्मात्यांना 24 मार्च 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून, अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.
राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव टाली, रुपाली ठोंबरेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
दरम्यान या वादावर केंद्र सरकारने देखील कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्ट केले की, या गाण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला. वैष्णव यांनी स्पष्ट केलं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निरपेक्ष नसून भारतीय संविधानाचे कलम 19(2) अंतर्गत वाजवी निर्बंधांच्या चौकटीतच असते. सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नैतिकतेच्या दृष्टीने आवश्यक असल्यास सरकार कठोर पावले उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही गाणे प्रदर्शित होताच त्याच्या बोलांवर आणि दृश्यांवरून तीव्र टीका सुरू झाली होती. अनेक सामाजिक संघटना आणि व्यक्तींनी या गाण्यात महिलांचे वस्तूकरण किल्ल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. एफआयआर दाखल करण्याच्या मागण्या आणि प्रसारण थांबवण्याचे आवाहन यामुळे हा मुद्दा काही दिवसांतच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला. या सर्व घडामोडींमुळे सरके चुनर ‘तेरी सरके ही गाणे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यांच्यावरील मोठ्या चर्चेचे केंद्र बनले आहे.
