Download App

Neena Gupta: ‘वाढदिवसाला शुभेच्छा देण्याऐवजी शोक…’; नीना गुप्ताच्या पोस्टने वेधलं लक्ष

  • Written By: Last Updated:

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा काल (4 जून) वाढदिवस होता. त्यांची मुलगी मसाबा गुप्ताने (Masaba Gupta) नीना यांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला होता. मसाबाने नीना यांना वाढदिवसानिमित्त दिलेलं गिफ्ट या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. नीना यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोपरदार सुरु आहे.


मसाबाने शेअर केलेल्या व्हिडीओत असे दिसून येत आहे की, नीना गुप्ता या म्हणतात की, ‘होय, माझा वाढदिवस आहे ! माझ्या वाढदिवशी दिलेल्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद. मला असे वाटते की 60 वर्षांनंतर वाढदिवस आला की लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे, कारण आता जगण्याचे वय कमी होत आहे. मी घरी चांगले पदार्थ खाऊन वाढदिवस साजरा करणार आहे’ मसाबानं या व्हिडीओला असे कॅप्शन दिले आहे.

आज नीनाजींचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या’ या व्हिडीओत मसाबाने नीना यांना गिफ्ट म्हणून दिलेलं प्रिंटेड जॅकेट देखील दिसून येत आहे. नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची नेहमीच मने जिंकत आले आहेत. बधाई दो, शुभमंगलम सावधान, गुड बाय आणि ऊंचाई या हिट सिनेमामध्ये नीना गुप्ता यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी पंचायत, मसाबा आणि पंचायत 2 या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली आहेत.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

पंचायत वेब सीरिजमध्ये त्यांनी साकारलेल्या मंजू देवी या भूमिकेचे अनेकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. लस्ट स्टोरीज 2, अनुराग बसूचा मेट्रो इन दिनो हा सिनेमा, रोमँटिक कॉमेडी पछत्तर का छोरा या नीना गुप्ता यांच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. नीना गुप्ता या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह राहत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. नीना गुप्ता यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला चाहते नेहमी पसंती देत असतात.

Tags

follow us