Video Viral : नीतू कपूरचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल…

Neetu Kapoor Video Viral: बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) सतत चर्चेत असतात. नीतू कपूर सध्या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहत असल्याचे दिसून येते. नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. त्या आलिया भट्टच्या ‘RRR’ या सिनेमातील ‘नाटू-नाटू’ (Naatu Naatu) या गाण्यावर भन्नाट डान्स करत असल्याचे दिसून येत आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 03T132423.256

Video Viral

Neetu Kapoor Video Viral: बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) सतत चर्चेत असतात. नीतू कपूर सध्या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहत असल्याचे दिसून येते. नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. त्या आलिया भट्टच्या ‘RRR’ या सिनेमातील ‘नाटू-नाटू’ (Naatu Naatu) या गाण्यावर भन्नाट डान्स करत असल्याचे दिसून येत आहे.


नीतूबरोबर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी देखील त्या गाण्यावर भन्नाट डान्स करत असल्याचे चाहत्यांना दिसून येत आहे. नीतू कपूरचा हा भन्नाट डान्स बघून चाहते आवाक् झाले आहेत. ६४ व्या वर्षातला नीतू कपूर यांचा फिटनेस आणि एनर्जी आज देखील अनेक तरुण अभिनेत्रींना लाजवणार असा आहे. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुर यांनी देखील नीतू कपूरबरोबर भन्नाट डान्स केला आहे.

त्या दोघींच्या उत्साहाचे सर्वत्र जोरदार कौतुक केले जात आहे. पद्मिनी कोल्हापुरे यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘माझ्या आवडत्या नीतू कपूरसोबत ‘नाटू-नाटू’वर नृत्य.. हळूहळू तेथे पोहोचेनच, Instareels’ असा कॅप्शन त्यांनी व्हिडीओच्या खाली दिला आहे. नीतू कपूर यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे आणि सांगितले आहे की, ‘त्यांनी जुन्या मैत्रिणीबरोबर ‘नाटू-नाटू’वर सर्वोत्तम प्रयत्न केला आहे.


या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीतू कपूर यांनी भावनिक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांचे जुने फोटो पोस्ट केले होते. अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर आलिया भट्टच्या मेट गाला २०२३ डेब्यूचा फोटो शेअर केला आहे.

Video Viral : नीतू कपूरचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल…

तसेच अभिनेत्री नीतू कपूर यांच्या एका पोस्टची बरीच चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी नीतूंनी केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या पोस्टमधून नीतू यांनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेन्ड कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांना टोला लगावल्याचे देखील सांगितले जात होते.

Exit mobile version