Download App

स्टार प्लसवरील ‘उडने की आशा’ शोमध्ये ड्रामा वाढणार; नेहा हरसोरा

  • Written By: Last Updated:

Star Plus show Udne Ki Aasha : स्टार प्लस वाहिनीवरील शो (Star Plus show) ‘ उडने की आशा’ आपल्या भामनोरंजक कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. यामध्ये सचिनची भूमिका कंवर ढिल्लनने तर नेहा हरसोराने सायलीची भूमिका साकारली. त्यांच्या आकर्षक कथा आणि मुख्य जोडीमधील मजबूत केमिस्ट्रीमुळे हा शो खूप लोकप्रिय झाला आहे. यावेळची कथा सचिन आणि सायली यांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या भावनिक आव्हानांवर केंद्रित (Entertainment News) आहे, जे पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Bangladesh Violence : …तर मुस्लिमांना ‘लाडकी बहिण योजने’तून वगळा; नितेश राणेंचा शाब्दिक वार

या मालिकेत (Udne Ki Aasha) पुढे अजून मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे. सचिन तेजसला नोकरीसाठी गाडी चालवायला सुचवतो, हे प्रेक्षकांना दिसेल. या सूचनेमुळे खळबळ माजते, जेव्हा रोशनीने सचिनचा सामना केला, त्याला अशिक्षित म्हटले आणि तिच्या पतीला अशी नोकरी सुचवल्याबद्दल त्याला विचारले. सायली सचिनच्या बचावासाठी पुढे आल्याने वाद आणखी वाढतो. सायली टिंगल करत रोशनीला सांगते कीत सचिनकडे किमान एक नोकरी आहे जी कुटुंबाला मदत करते, तर तेजसने त्याच्या नोकरीबद्दल खोटे बोलून सर्वांची फसवणूक केली आहे.

या अपमानामुळे संतापलेल्या रोशनीने सचिन आणि सायली (Neha Harsora) अपमान करत राहिल्यास तेजससोबत घर सोडून जाईन, अशी धमकी दिली. या कठोर अल्टीमेटमने सचिन आणि सायलीला धक्का बसला आणि पुढे काय होणार आहे हे त्यांना कळत नाही.

पुन्हा शेतकरी आंदोलन, 14 डिसेंबरला दिल्लीला जाणार, शेतकरी संघटनेची घोषणा

स्टार प्लस शो ‘उडने की आशा’मध्ये सायलीची भूमिका साकारणारी नेहा हरसोरा म्हणते की, “उडने की आशाच्या पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना भरपूर नाटक पाहायला मिळणार आहे. तेजसच्या कामाबद्दलचं सत्य आता समोर आलंय. यामुळे सचिन आणि सायली यांच्यासमोर खडतर प्रश्न निर्माण झाला आहे. ही माहिती घरच्यांना दिल्याने चिंतेत असलेल्या तेजसला टीकेचा सामना करावा लागत आहे. या तणावात भर घालण्यासाठी रोशनीने अप्रामाणिकपणामुळे घर सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. प्रत्येक ट्विस्टने मालिकेत अजून ड्रामा वाढत जाणार असल्याचं नेहाने म्हटलं आहे. ‘उडने की आशा’ ही मालिका 11 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त स्टार प्लसवर पाहता येणार आहे.

follow us