Download App

नेहरूंची ऑफर स्विकारली असती तर Oppenheimer भारतीय असते, वाचा किस्सा…

Oppenheimer Movie : ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या हॉलिवूड (Hollywood) सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ओपनहायमर’ या अणु बॉम्बचे जनक यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये आता आणखी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे त्यांच्या जीवनावर एक पुस्तक आलं होत त्यात सांगण्यात आलं आहे की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ओपनहायमर यांना भारताचं नागरिकत्व स्विकारण्याची ऑफर दिली होती. ( Neither Oppenheimer would be an Indian by Pandit Javaharlal Nehru’s offer )

ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध शास्त्रज्ञ होमी भाभा आणि ओपनहायमर मित्र होते. असं भाभा यांच्या जीवन चरित्रामध्ये लेखक बख्तियार यांनी लिहिलं आहे. त्यांची भेट झाली होती. ओपनहायमर यांनी संस्कृत, लॅटीन आणि ग्रीक भाषा येत होत्या. तर ओपनहायमरने अणु बॉम्ब बनवल्यानंतर त्याची विनाशकारी क्षमता पाहता त्याने अशा प्रकारच्या शक्तीशाली शस्त्रांच्या निर्मीतीला आणि हायड्रोजन बॉम्ब बनवायला ही नकार दिला. त्यावर अमेरिकन सरकारने त्यांची सुरक्षा काढली. त्यांची चौकशी लावली. तसेच त्यांच्यावर साम्यवादाचे आरोप केले. त्याच वेळी होमी भाभांच्या सांगण्यानुसार नेहरूंनी ओपेनहायमर यांना भारतात येण्याची ऑफर दिली होती.

Kaustubh Savarkar Post: ‘असा तो एक पांतस्थ’; वडिलांच्या आठवणीत जयंत सावरकर भावुक!

मात्र यावर ओपेनहायमर यांनी नेहरूंची ही ऑफर नम्रपणे नाकारली. कारण अमेरिकन सरकारने त्यांच्यावर असे गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी नैतिकदृष्ट्या अमेरिका सोडणे योग्य नाही. कारण त्यांना वाटत होत की, सरकार त्यांना अमेरिका सोडू देणार नाही. तसेच देश सेडल्यास त्यांच्यावरूल आरोपांना दुजोरा मिळेल. त्यामुळे ओपेनहायमर यांनी नेहरूंची ही ऑफर नम्रपणे नाकारली. नाही तर ओपेनहायमर भारतीय असते.

दरम्यान ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. देशात गेल्या काही दिवसापासून या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर ( J Robert Oppenheimer) यांच्या जीवनावर हा सिनेमा काढण्यात आलेला आहे. देशात या सिनेमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘ओपनहायमर’ने पहिल्याच दिवशी १३ ते १४ कोटींचा गल्ला कमावल्याचे दिसून आले आहे. ‘ओपनहायमर’सोबत हॉलिवूडचा ‘बार्बी’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. परंतु त्यापेक्षा सर्वात जास्त उत्सुकता ही ख्रिस्तोफर नोलनच्या सिनेमाची पाहायला मिळाली आहे.

Tags

follow us