Download App

Kirkol Navre: नवं कोरं धम्माल विनोदी नाटक “किरकोळ नवरे”

Kirkol Navre: आपल्या खमक्या आणि विचित्र स्वभावाने नवऱ्याला कायम वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलमधून प्रत्येकाच्या घरात पोहचलेली अनिता दाते आता नव्या नाटकातून चाहत्यांच्या भेटीला येते आहे. ११ ऑगस्टला अनिता दाते, सागर देशमुख आणि पुष्कराज चिरपुटकर या तिघांची मुख्य भूमिका असलेलं हे नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले आहे. किरकोळ नवरे हे नावच सांगून जात आहे की, नाटक खूपच विनोदी आणि धम्माल राहणार आहे. आता या नाटकामध्ये हे तीन कलाकार काय नेमकी धमाल करणार आहेत? हे बघणं आता महत्त्वाचं राहणार आहे.


हसून हसून दमछाक करणारं डामचिक नाटक अशी टॅगलाईन या नाटकाला दिली आहे. अभिनेत्री अनिता दातेबरोबर सागर देशमुख आणि पुष्करराज चिरपुटकर हा देखील दिसून येणार आहे. अनामिका, युवांजनी नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन सागर देशमुख याचे असल्याचे सांगितले जात आहे.

आजपर्यंत अनेक भूमिकांमधून या तिघांनी चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करणार आहेत, यासाठी हे नाटक बघायला पाहिजे. मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करत असताना आम्ही खूप मजा करत असतो. त्यामुळे चाहतेही हे नाटक तितकचं धमाल करतील, असा विश्वास यावेळी या तिघांनी व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘किरकोळ नवरे’ हे धम्माल विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याविषयी आहे. परंतु नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतन प्रेमाबद्दल देखील सांगणारे आहे. या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर आहेत. दिग्दर्शन सहाय्य कल्पेश समेळ तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत सौरभ भालेराव यांचे आहे, तर गीते जितेंद्र जोशी यांनी लिहिली आहेत. प्रकाशयोजना विक्रांत ठकार तर वेशभूषा सोनल खराडे यांची असल्याचे पाहायला मिळणार आहे.

शुक्रवारी ११ ऑगस्ट दु. ४.१५ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे आणि शनिवार १२ ऑगस्ट दु. ४:३० वाजता सावित्रीबाई फुले, डोंबिवली येथे अशा अनेक ठिकाणी या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रंगताना पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us