Download App

Salaar: शाहरुख खानशी थेट पंगा घेणार प्रभास; ‘सालार’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार भेटीला

Salaar Movie Poster Out: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आगामी ‘सालार’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आलेले संवाद आणि ( Salaar Movie Poster) काही थरारक दृश्यांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. (Salaar New Movie) दरम्यान होंबळे फिल्म्सने पृथ्वीराज सुकुमारनचे एक पोस्टर शेअर केले आहे. (Social media) यामध्ये तो वर्धराज मन्नार, द किंगच्या भूमिकेत दिसणार आहे.


पृथ्वीराजच्या वाढदिवसानिमित्त चित्रपट निर्मात्यांनी त्याच्या व्यक्तिरेखेचा लुक आणि नाव प्रेक्षकांसोबत शेअर केले आणि कॅप्शनमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सालार’ हा सिनेमा २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सालार पार्ट-1 रिलीज झाल्यानंतर पार्ट-2 देखील रिलीज होणार आहे.

या सिनेमाच्या टीझरची सुरुवात एका माणसाने (टिनू आनंद) कारमध्ये बसून होते. बरेच लोक त्याच्याकडे रायफल आणि इतर शस्त्रे दाखवत उभे आहेत आणि वेगवेगळ्या भाषेत बोलत आहेत. मग टिनू आनंद म्हणतो की, साधे इंग्रजी, गोंधळ नाही. चित्ता, वाघ, हत्ती हे अतिशय धोकादायक आहेत. परंतु जुरासिक पार्कमध्ये नाही. कारण त्या पार्कमध्ये… इंटा म्हटल्यावर टिनू थांबतो. यानंतर सीन कट होतो आणि प्रभास हातात चाकू आणि रायफल घेऊन शत्रूंना मारत असल्याचे बघायला मिळत आहे. प्रभासशिवाय या टीझरमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा पृथ्वीराज सुकुमारन देखील आहे. सालारचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत, ज्यांनी याअगोदर KGF सारख्या दमदार अॅक्शन चित्रपटांचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’

विजयबालन यांनी ट्विटरवर ट्विट करत सांगितले आहे की, KGF-2 च्या क्लायमॅक्समध्ये रॉकी भाईवर संध्याकाळी 5.12 वाजता हल्ला होतो आणि त्यानंतर रॉकीचे जहाज समुद्रात बुडते. प्रभासच्या ‘सालार’चा टीझर रिलीज करण्याची वेळ संध्याकाळी 5.12 वाजता ठेवण्यात आली होती. तसेच प्रशांत नीलची ही काही शक्तिशाली योजना आहे, ज्याद्वारे केजीएफ आणि सालार यांच्यात कनेक्शन केले जाणार असा अंदाज वर्तवला जात आहे. सालारचा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यात केजीएफची अनुभूती आहे.

‘सालार’ आणि ‘डिंकी’ या सिनेमाची रिलीज डेट एकच आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी टक्कर बघायला मिळणार आहे. आता नेमका कोणता चित्रपट काय कमाल करतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us