Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’

Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’

Kangana Ranaut Movie: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे (Social media) व्यक्त होणं ही कंगनाची खासियत आहे. सध्या कंगना तिच्या आगामी ‘तेजस’ (Tejas Movie ) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् लोकांनाही तो पसंत पडला आहे. (Emergency Movie) यासोबतच कंगनाच्या आगामी सिनेमाची देखील बरीच चर्चा रंगली आहे. त्यापैकी बहुप्रतीक्षित अशा ‘इमर्जन्सी’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.


गेल्या काही महिन्यांपूर्वी कंगनाने तिच्या या ‘इमर्जन्सी’ सिनेमाचा नवा टीझर शेअर केला होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या ट्रेलरमधील कंगनाच्या लूकची तिच्या देहबोलीची जोरदार चर्चा केली जात आहे. तसेच संवादफेकीची खूप प्रशंसा होत आहे. कंगनाने या सिनेमाच्या सेटवर देखील काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. टीझरपासूनच चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. परंतु आता चाहत्यांना देखील या सिनेमासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. कारण हा सिनेमा आता २४ नोव्हेंबर दिवशी म्हणजेच दिवाळीत प्रदर्शित होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

कंगनाने या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्याचे बघायला मिळत आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने सांगितले आहे की, “मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. इमर्जन्सि हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे, यामध्ये माझा प्रचंड वेळ आणि पैसा गुंतला आहे आणि यातून मला बरंच काही शिकायला देखील मिळालं आहे. तुम्ही याच्या टीझरला जो प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली असल्याचे तिने ट्विटमध्ये सांगितले आहे.

Tejas Song Release: कंगना रणौतच्या ‘तेजस’चा जबरदस्त गाण्याची पहिली झलक प्रदर्शित

तसेच मला लोक कायम माझ्या इमर्जन्सी या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारखेविषयी विचारत आहे. आम्ही याची तारीख २४ नोव्हेंबर २०२३ ठरवली होती. परंतु माझे एकापाठोपाठ होत असलेले सिनेमे यामुळे यात काही बदल होणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. यामुळे हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अद्याप याची प्रदर्शनाची तारीख नक्की झाली नाही. परंतु तुमची उत्सुकता, आशीर्वाद असेच कायम असू द्या, अशी पोस्ट तिने यावेळी केली आहे,

कंगना ‘इमर्जन्सी’ या सिनेमात इंदिरा गांधी यांच्या मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. सोबतच अनुपम खेर, महिमा चौधरी, सतीश कौशिक, मिलिंद सोमणसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये बघायला आहेत. अभिनयासह कंगनाने या सिनेमाचे दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube