Tejas Song Release: कंगना रणौतच्या ‘तेजस’चा जबरदस्त गाण्याची पहिली झलक प्रदर्शित

Tejas Song Release: कंगना रणौतच्या ‘तेजस’चा जबरदस्त गाण्याची पहिली झलक प्रदर्शित

Tejas Movie First Song Release: अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती राजकारणाबद्दलही तिची सडेतोड मत मांडत असते. बऱ्याचदा राजकीय घटनांबाबत देखील ती प्रतिक्रियाही देते. सध्या तिच्या (Kangana Ranaut) आगामी सिनेमा ‘तेजस’चा (Tejas Movie ) ट्रेलर ८ ऑक्टोबर दिवशी प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या दमदार ट्रेलरने आता चाहत्यांना थक्क केले आहे. कंगनाची या सिनेमातीळ पहिल्या गाण्याची झलक सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित केले आहे.

कंगना रनौतच्या ‘तेजस’ या आगामी सिनेमातील ‘जान दा’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगआणि शाश्वत सचदेव यांनी गायले आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवरून या गाण्याची पहिली झलक पोस्ट करत गाणे रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. ‘है इश्क जैसा आसमान दा’ असे कॅप्शन देत कंगनाने हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

‘जान दा’ गाण्यामध्ये कंगनाचा ‘फायटर पायलट’ बनण्याचा प्रवास बघायला मिळत आहे. त्यानंतर यशस्वी फायटर पायलट झाल्याचा आनंद देखील या गाण्यात बघायला मिळत आहे. कंगना रनौत आणि वरून मित्रा या दोघांची केमिस्ट्री देखील दाखविण्यात आली आहे. देशभक्ती आणि प्रेम याचा अप्रतिम मेळ आपल्याला या गाण्यामध्ये बघायला मिळत आहे.

Singham Again : रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिकाचा खतरनाक लूक पाहिलात का?

तसेच कंगनाचा ‘तेजस’ हा आगामी सिनेमा २७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात कंगना, अंशुल चौहान, भरून मित्रा, आशिष विद्यार्थी, विशाखा नायर हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकताच कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. तर इंदिरा गांधी यांच्यावर जीवनावर आधारित ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube