Download App

‘War 2’ चा नवीन पोस्टर प्रदर्शित; 30 दिवसांचा काउंटडाउन सुरू

War 2 : यशराज फिल्म्सचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर 'वॉर 2' (War 2) आता फक्त 30 दिवसांवर येऊन ठेपला आहे. वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील

  • Written By: Last Updated:

War 2 : यशराज फिल्म्सचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर ‘वॉर 2’ (War 2) आता फक्त 30 दिवसांवर येऊन ठेपला आहे. वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील (YRF Spy Universe) हा नवीन अध्याय 2025 मधील सर्वात मोठा सिनेमॅटिक अ‍ॅक्शन अनुभव ठरणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन (Hrithik Roshan), ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.

14 ऑगस्ट रोजी हा बहुचर्चित चित्रपट हिंदीसह तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वायआरएफ ने नुकताच एक नवा दमदार पोस्टर रिलीज केला असून त्यामध्ये तिघांची जबरदस्त झलक पाहायला मिळते. या पोस्टरने सिनेमाच्या 30 दिवसांच्या काउंटडाउनची सुरुवात झाली आहे आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘वॉर 2’ ही स्पाय युनिव्हर्समधील सर्वात मोठी टक्कर दाखवणारी फिल्म ठरणार आहे आणि ‘पठाण’ व ‘टायगर’ च्या यशानंतर हे युनिव्हर्स आणखी भव्य बनणार हे निश्चित आहे.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही

follow us