Shakuntalam : समांथाच्या शाकुंतलमचं नवं पोस्टर समोर, ‘या’ दिवशी येणार चित्रपट

चेन्नई : गेल्या काही दिवसांपूर्वीचं दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभुच्या शाकुंतलम या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या निर्मात्यांकडून या चित्रपटचं नवीन पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये शकुंतलाच्या लूकमध्ये असेलेली समांथा एका तळ्या शेजारी असून त्या तळ्यामध्ये बदकांचं जलतरण सुरू आहे. या नयनरम्य पोस्टरवरच आपल्याला चित्रपटाच्या रिलीजची डेट देखील समजते. View this […]

Samantha

Samantha

चेन्नई : गेल्या काही दिवसांपूर्वीचं दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभुच्या शाकुंतलम या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या निर्मात्यांकडून या चित्रपटचं नवीन पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये शकुंतलाच्या लूकमध्ये असेलेली समांथा एका तळ्या शेजारी असून त्या तळ्यामध्ये बदकांचं जलतरण सुरू आहे. या नयनरम्य पोस्टरवरच आपल्याला चित्रपटाच्या रिलीजची डेट देखील समजते.

हा चित्रपट 17 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण गेल्या काही दिवसांपूर्वीचं चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. निर्मात्यांकडून ही माहिती देण्यात आली की, ‘आम्हाला वाईट वाटतय की, आम्ही शाकुंतलम चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज करू शकणार नाही. तर लवकरच आम्ही चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करू’

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. गेल्या काही दिवसांपूर्वीचं या बहुचर्चित चित्रपटाचा ‘शाकुंतलमचा’ट्रेलर रिलीज झाला आहे. तर रिलीज झाल्यापासून हा ट्रेलर सोशल मिडीयावर ट्रेंड करतोय. हा ट्रेलर तेलुगूशिवाय हिंदीमध्ये देखील रिलीज करण्यात आला आहे. 2 मिनिट 52 सेकंडच्या या शकुंतलमच्या ट्रेलरने पुन्हा एकदा सामंथा देशभर आणि जगभर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे.

Women’s Day : शाकुंतलमच्या निर्मात्यांनी दिल्या महिला दिनाच्या अनोख्या शुभेच्छा !

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखर यांनी केलं आहे. तर दिल राजु यांनी श्री व्यंकटेश्वर क्रिएशन्सच्या आणि गुणा टीम वर्क्सच्यासाथीने या चित्रपटाचं सादरीकरण केलं आहे. तर निलिमा गुणा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट थ्री डीमध्ये रिलीज होणार आहे. 14 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version