Patriotic Song : ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ अमृता फडणवीसांचं नव गाणं

मुंबई : गायिका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक नव गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं एक देशभक्तीपर गीत आहे. या गाण्याची घोषणा त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. अमृता फडणवीस यांनी या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे […]

Untitled Design (74)

Untitled Design (74)

मुंबई : गायिका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक नव गाणं रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं एक देशभक्तीपर गीत आहे. या गाण्याची घोषणा त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे.

अमृता फडणवीस यांनी या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा ! ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गीत गाताना आनंद वाटतो. हे गाणं आगामी देशभक्तीपर आणि बहुभाषिक चित्रपट ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील आहे. संगीत सत्या कश्यप यांनी संगीत देऊन या गाण्याला छान बनवलं आहे. असं त्या या पोस्टमध्ये म्हणाल्या तर त्यांनी त्यात या गाण्याची यूट्यूब लिंक दिली आहे.

हे गाणं आगामी देशभक्तीपर चित्रपट ‘भारतीयन्स’ या चित्रपटातील आहे. हा विविध भाषांमध्ये रिलीज होणारा चित्रपट आहे. तर या गाण्याला संगीतकार सत्या कश्यप यांनी संगीत दिले आहे. गायिका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे.

नुकतच काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचं अज मैं मूड बना लिया हे पंजाबी गाणे रिलीज झाली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळाला.

Exit mobile version