‘फुलौरी बिना चटणी कैसे बनी’च्या तालावर थिरकणार चाहते; धमाल 4चे नवे गाणे रिलीज होताच व्हायरल

धमाल 4 चित्रपटातील ‘चटणी’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून, रिलीज होताच ते सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Untitled Design (45)

Untitled Design (45)

New song from Dhamaal 4 released : धमाल ट्रेलरमधून प्रेक्षकांना हास्याची आणि नॉस्टॅल्जियाची सफर घडवणारा धमाल ४ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील ‘चटणी’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून, रिलीज होताच ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. भोजपुरी लोकसंगीताची ऊर्जा आणि धमाल फ्रँचायझीची मस्ती यांचा संगम असलेले हे गाणे “फुलौरी बिना चटणी कैसे बनी” या लोकप्रिय ओळींवर आधारित असून आकर्षक ठेका आणि जोशपूर्ण लयींनी सजलेले आहे.

या गाण्यात अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अंजली आनंद आणि रवी किशन यांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते. विशेष म्हणजे रवी किशन यांनी आपल्या खास भोजपुरी अंदाजाने आणि स्वॅगने गाण्याला वेगळीच रंगत आणली आहे. गाण्यात धमाल फ्रँचायझीची ओळख असलेली मस्ती, गोंधळ आणि विनोदाचा भरपूर तडका पाहायला मिळतो.

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा मोठा परिणाम; धास्तीपोटी ग्रामीण भागात सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद

या गाण्याला नीलकमल सिंह आणि ममता शर्मा यांनी आवाज दिला असून धीरज बबुआन यांनी गीतलेखन केले आहे. नीलकमल सिंह आणि आदित्य देव यांनी संगीत दिले असून राहुल शेट्टी यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. गाण्याबाबत बोलताना नीलकमल सिंह म्हणाले की, “फुलौरी बिना चटणी कैसे बनी” हे गाणे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. धमाल 4 साठी हे गाणे सादर करताना खूप आनंद मिळाला आणि प्रेक्षकही त्याचा तितकाच आनंद घेतील, असा विश्वास आहे. तर ममता शर्मा यांनी सांगितले की, धमाल ही त्यांच्या आवडत्या फ्रँचायझींपैकी एक असून या चित्रपटातील गाण्याला आवाज देणे त्यांच्यासाठी खूप खास अनुभव ठरला.

🪀 देशातील आणि राज्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV

कॉमेडी आणि मनोरंजनाचा जबरदस्त डोस घेऊन येणाऱ्या धमाल 4 मध्ये अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, संजय मिश्रा, ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन यांसारखे कलाकार झळकणार आहेत. टी-सीरिज आणि गुलशन कुमार प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, इंद्र कुमार, आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक यांनी निर्मिती केली आहे. बहुप्रतीक्षित धमाल 4 हा चित्रपट 10 जुलै 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version