“लल्ला… तैयार रहना!” Amazon Prime Video कडून ‘सुबेदार’ मधील नवीन गाणं रिलीज

Subedar : ‘लल्ला अँथम: अ वॉर्निंग फ्रॉम सुबेदार’ला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर Amazon Prime Video आणि T-Series यांनी आज त्यांच्या

Subedar

Subedar

Subedar : ‘लल्ला अँथम: अ वॉर्निंग फ्रॉम सुबेदार’ला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर Amazon Prime Video आणि T-Series यांनी आज त्यांच्या आगामी प्राइम ओरिजिनल चित्रपट ‘सुबेदार’मधील अधिकृत ‘लल्ला’ गाण्याचा हाय-व्होल्टेज व्हिडिओ प्रदर्शित केला. दिग्गज अभिनेते अनिल कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील हे गाणे ऊर्जा, अभिमान आणि सुबेदार अर्जुन मौर्य यांच्या अढळ नैतिक मूल्यांचे प्रभावी दर्शन घडवते.

रोहन-विनायक यांच्या संगीतबद्ध या गाण्याचे शब्द ऋषी उपाध्याय यांनी लिहिले असून, विशाल ददलानी यांच्या दमदार आणि प्रभावी आवाजामुळे या ट्रॅकला वेगळीच धार मिळाली आहे. ‘लल्ला’ हे गाणे अभिमान आणि नियंत्रण यांच्यातील तीव्र संघर्षाचे संगीतबद्ध रूप सादर करते. ठेक्यांच्या जोरदार आणि संयमित उभारणीमुळे पडद्यावरचा तणाव अधिक तीव्रतेने जाणवते.

गाण्याच्या व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण दृश्यांची झलक दाखवण्यात आली आहे. आदित्य रावल, सौरभ शुक्ला, फैसल मलिक, मोना सिंह आणि राधिका मदान यांच्या व्यक्तिरेखांचे प्रभावी क्षण यातून दिसतात, ज्यामुळे सुबेदार अर्जुन मौर्य (अनिल कपूर) यांच्याभोवतीचे भावनिक आणि कथानकाचे दांव अधिक तीव्र होतात. सुरुवातीला उत्तेजक ठेक्यांपासून सुरू होणारे हे गाणे अखेरीस एक ठाम इशारा देते ‘सुबेदारशी पंगा घेऊ नका.’

गाण्याबाबत बोलताना विशाल ददलानी म्हणाले , “जेव्हा ‘लल्ला’ अँथमचा भाग म्हणून प्रदर्शित झाले, तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्या ऊर्जेशी त्वरित नाळ जुळवली. मात्र पूर्ण गाणे म्हणून ते अधिक गहिरे आहे. त्यातील संयमित तीव्रता विशेष जाणवते. स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्याची आणि स्वतःची जागा निर्माण करण्याची भावना यात आहे.

अजितदादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त; CM फडणवीसांची मोठी घोषणा

ध्वनिमुद्रण करताना माझा आवाज अनिल सर पडद्यावर ज्या ताकदीने आणि निर्धाराने उभे राहतात, त्याला साजेसा असावा, याची काळजी घेतली. हे गाणे केवळ वर्चस्वाबद्दल नाही, तर अंतर्गत शक्तीबद्दलही आहे.” ‘सुबेदार’ हा चित्रपट 5 मार्च रोजी Amazon Prime Video वर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश व प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version