Download App

Kisi Ka Bhai Kisi Ki Jan चं आणखी एका गाण्याचा टीझर आला, सलमानचा लुंगी अवतार

मुंबई : सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ साठी मेहनत घेत आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटातील अपडेट्स शेअर करत असतो. आता त्याने या चित्रपटातील आणखी एका गाण्याचा टीझर शेअर केला आहे. याअगोदर या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’हे गाणं प्रक्षकांच्या भेटीला आलं होत. याही गाण्याचा टीझर शेअर केला होता. त्याचबरोबर या चित्रपटात ‘नैयो लगदा’ , ‘बिल्ली बिल्ली’, ‘बठुकम्मा’ यांसारखे गाणे ही असणार आहेत.

‘येंतम्मा’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याचं विशेष म्हणजे हे गाणं एक हिंदी-तेलुगु फ्यूजन आहे. या टीझरमध्ये सलमान आणि वेंकटेश लुंगीमध्ये दिसत आहे. दक्षिण भारतातील संस्कृतीचा सोहळा ते साजरा करत आहेत. तर पायल देवने हे गाणं कंपोज केलं आहे. विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणं गायलं आहे. शब्बीर अहमद यांनी हे गां लिहिलं आहे. कोरियोग्राफी जानी मास्टर यांनी केलं आहे.

या टीजरमध्ये शेवटी एका मिस्ट्री मॅनला सलमान आणि वेंकटेशला डांस फ्लोरवर जॉईन करताना दिसत आहे. त्यामुळे हा मिस्ट्रीमॅन कोण? तो राम चरण तर नाही. असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण तो याअगोदर या चित्रपटाच्या सेटवर दिसला होता.

Salman Khan: सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा

‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. त्यामुळे ईद निमित्त चाहत्यांना सलमान खानचे हे गिफ्ट असणार आहे. 21 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. साजिद नाडियाडवालाने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे.

Tags

follow us