Pathan : शाहरुखच्या ‘त्या’ फोटोचं निखिल वागळे यांनी केलं कौतुक !

मुंबई : ‘सध्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठान (Pathaan) सिनेमा तुफान चाललाय. यानिमित्ताने पठाणी किंवा पश्तून परंपरेची आठवण काढली जातेय. शहारुखचं कुटुंब याच पश्तुनी परंपरेशी नातं सांगतं. त्याचे वडिल मीर ताज मोहमद खान पश्तून होते. गांधीजींचे अनुयायी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशहा खान यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं. बादशहा खान यांच्या खुदा-ई-खिदमतकार […]

Untitled Design   2023 02 11T152153.540

Untitled Design 2023 02 11T152153.540

मुंबई : ‘सध्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठान (Pathaan) सिनेमा तुफान चाललाय. यानिमित्ताने पठाणी किंवा पश्तून परंपरेची आठवण काढली जातेय. शहारुखचं कुटुंब याच पश्तुनी परंपरेशी नातं सांगतं. त्याचे वडिल मीर ताज मोहमद खान पश्तून होते. गांधीजींचे अनुयायी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशहा खान यांना त्यांनी आपला नेता मानलं होतं. बादशहा खान यांच्या खुदा-ई-खिदमतकार या संघटनेचे ते सदस्य होते.’

‘पठाणांचा इतिहास हिंसेचा, सूडाचा आहे. ते मरण पत्करतील पण शत्रूपुढे झुकणार नाहीत. बादशहा खान यांनी या झुंजार जमातीवर अहिंसेचे संस्कार केले. या फोटोत शाहरुखच्या हातात जे पुस्तक आहे ते खुदा- ई-खिदमतगारचा इतिहास सांगतं. भारत सरकारने या कार्याबद्दल बादशहा खान यांना भारतरत्न दिलं. शाहरुखची अदब, कणखरपणा, नम्रपणा कुठून येते हे आता कळू शकेल.’ अशी पोस्ट करत जेष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Vagale) यांनी अभिनेता शाहरूख खानचं (Shah Rukh Khan) कौतुक केलं आहे.

ही पोस्ट करताना पत्रकार निखिल वागळे यांनी अभिनेता शाहरूख खानचा एक फोटो देखील शोअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातामध्ये खुदा- ई-खिदमतगारचा इतिहास सांगणारं पुस्तक आहे. तर या पुस्तकाचा संदर्भ सांगत वागळे यांनी शाहरूखच्या कुटुंबाचा देखील इतिहास सांगितला आहे. हे सांगत त्यांनी अभिनेता शाहरूख खानचं कौतुक केलं आहे.

Tanaji Sawant : ‘मोदी हे महादेवाचा अवतार’ : तानाजी सावंतांचे विधान

दरम्यान हिंदी चित्रपटांचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा चित्रपट ‘पठान’ ने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कमाईच्या बाबतीत देखील अनेक रिकॉर्ड करणाऱ्या ‘पठान’ (Pathaan) ची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

Exit mobile version