Download App

थरारक क्राईम ड्रामा! ‘निशांची’च पहिलं पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

Nishanchi Drama First Poster Unveiled : अ‍ॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया यांनी त्यांच्या आगामी थियेट्रिकल फिल्म ‘निशांची’ चं (Nishanchi) बहुचर्चित आणि प्रभावी फर्स्ट लुक पोस्टर आज प्रदर्शित (Entertainment News) केलं आहे. जार पिक्चर्सच्या अजय राय आणि रंजन सिंग यांच्या बॅनरखाली, फ्लिप फिल्म्सच्या सहनिर्मितीत तयार झालेली ही फिल्म एक सशक्त आणि थरारक क्राईम ड्रामा (Crime Drama) आहे, ज्याचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं आहे.

‘निशांची’ या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत आणि विशेष बाब म्हणजे ते या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत आहेत. अनुराग कश्यप यांच्या रॉ, देशी आणि रिअल स्टोरीटेलिंग शैलीतून साकारलेली ही कथा व्यावसायिक मसाला सिनेमाची चव देखील घेऊन येते. ‘निशांची’ ही दोन भावांची कथा आहे. दिसायला अगदी सारखे पण विचारांनी, मार्गांनी आणि निर्णयांनी एकमेकांपासून पूर्ण वेगळे. त्यांच्या निवडी त्यांचं नशीब ठरवतात, आणि त्यांची कहाणी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे.

या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेसोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे दमदार कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘निशांची’ 19 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात थेट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं फर्स्ट लुक पोस्टर पारंपरिक भारतीय सिनेमाची खरीखुरी झलक दाखवतं – बोल्ड, अनेक स्तरांमध्ये गुंतलेली आणि जबरदस्त ड्राम्याने भरलेली कहाणी. रंगांची उधळण, भावनांचा प्रचंड आवेग आणि प्रेम, सूड व नियती यांचं एकमेकांशी होणारं टकराव या चित्रपटाच्या पोस्टरमधूनच जाणवू लागतं.

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चं पहिलं गाणं प्रदर्शित; पडद्यावर झळकली सुबोध-रिंकूच्या नात्याची मिश्किल झलक

या कथेच्या केंद्रस्थानी आहेत ऐश्वर्य ठाकरे, जे या चित्रपटात जुळ्या भावांची दुहेरी भूमिका साकारत आहेत. हे दोघं भाव एकाच चेहऱ्याचे असले तरी त्यांच्या आयुष्यातील मार्ग भिन्न आहेत. मात्र, दोघेही अशा एका वादळात अडकतात जे कोणत्याही क्षणी फुटून निघू शकतं. ‘निशांची’ हा एक असा सिनेमा आहे जो दमदार पार्श्वसंगीत, भारावणारे दृश्य, खोल भावनांचा स्पर्श आणि उच्च स्तराच्या नाट्याने भरलेला आहे. ही फिल्म केवळ एक कहाणी नसून सिनेमॅटिक रोलरकोस्टर आहे, जी केवळ मोठ्या पडद्यावरच अनुभवता येईल.

वॉर 2 चं पहिलं वहिलं गाणं रिलीज; आवां जावांने घातली प्रेक्षकांना भूरळ!

ही जबरदस्त आणि हृदयाला भिडणारी कथा अजय राय आणि रंजन सिंग यांनी जार पिक्चर्स अंतर्गत, फ्लिप फिल्म्ससोबत मिळून निर्माण केली आहे. चित्रपटाची कहाणी प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी संयुक्तपणे लिहिलेली आहे. तर, 19 सप्टेंबरला सज्ज व्हा—गोळ्यांची थरथर, फसवणूक आणि बंधुभाव अनुभवण्यासाठी! ‘निशांची’ येतेय एक भेदक, तगडी आणि अविस्मरणीय कहाणी घेऊन.

 

follow us