वॉर 2 चं पहिलं वहिलं गाणं रिलीज; आवां जावांने घातली प्रेक्षकांना भूरळ!

वॉर 2 चं पहिलं वहिलं गाणं रिलीज; आवां जावांने घातली प्रेक्षकांना भूरळ!

The first song of War 2 released Aawan Jawaan has left the audience spellbound : यश राज फिल्म्स कियारा अडवाणी आणि तिच्या चाहत्यांसाठी खास भेट आली येत आहे. कारण वॉर 2 (War 2) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवां जावां’, जे एक रोमँटिक आणि ग्रूवी ट्रॅक आहे. कियाराच्या (Kiara Advani) वाढदिवसाच्या निमित्ताने रिलीज करण्यात आलं आहे. वॉर 2 चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी काल त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली होती.

जा, तुम्हाला संगळांना सोडलंय ! मालेगाव बॉम्बस्फोटाची A टू Z स्टोरी

त्यांनी सांगितलं की पहिलं गाणं ‘आवां जावां’ हे असेल आणि या गाण्यात सुपरस्टार हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहेत. अयानने हेही उघड केलं की ‘ब्रह्मास्त्र’ मधील सुपरहिट गाणं ‘केसरिया’ तयार करणारी टीम प्रीतम दादा, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित सिंग पुन्हा एकत्र आली आहे ‘आवन जावन’ साठी.

पुण्यात 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान ‘विनायकी क्रीडा महोत्सव’, माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

अयान ने लिहिलं: ”प्रीतम दादा. अमिताभ. अरिजित. हृतिक आणि कियाराची अफलातून केमिस्ट्री, जे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसतील. रोमँटिक आणि ग्रूवी ‘आवन जावन’ आमच्या इटली शूटचं थीम सॉंग होतं. हे गाणं तयार करताना आमच्या संपूर्ण टीमला प्रचंड आनंद आणि उत्साह मिळाला.

मालेगाव स्फोट निकालावर फडणवीसांची सर्वात छोटी पोस्ट; राजकीय वर्तुळातून काय उमटल्या प्रतिक्रिया?

हे गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे!” वॉर 2 हा यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा महत्त्वाचा भाग आहे आणि 14 ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

कसं आहे गाणं?

चार मिनिटांच्या या गाण्याने चाहत्यांना भूरळ घातली आहे. यातील ह्रतिक आणि कियाराच्या रोमॅंटीक अंदाजाने चाहते त्यांच्या प्रेमात पडले आहेत. तसेच कियाराच्या बोल्ड फिगर फ्लॉन्टने हे गाणं चर्चेत आलं आहे. तिच्या या बिकीनी लुकसह ह्रतिकचा लूकही चाहत्यांना भावला आहे. सोशल मिडीयावर चाहते या दोघांसह चित्रपटावर देखील कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube