Nitesh Pandey Death: ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Nitesh Pandey Death: टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे 23 मे रोजी (काल) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘अनुपमा’ प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात मोठी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 24T103701.035

Nitesh Pandey Death

Nitesh Pandey Death: टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे 23 मे रोजी (काल) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘अनुपमा’ प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

लेखक सिद्धार्थ नागर यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. सिद्धार्थ नगर यांनी सांगितले आहे की, नितीश एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांना नितीश पांडे यांच्या निधनाची बातमी मिळाली. नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. त्या ठिकाणी रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, मृतदेह केव्हा आणण्यात आला आणि अंत्यसंस्कार केव्हा होणार याबाबत त्यांना फारशी माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मिलेल्या माहितीनुसार टीव्ही अभिनेता नितेश पांडे महाराष्ट्रातील नाशिकच्या इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू. प्रथमदर्शनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे दिसते. पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये हजर असून तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. हॉटेल कर्मचारी आणि त्याच्या जवळच्या लोकांची चौकशी केली जात आहे

प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे अपघाती निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा

या चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते

नितेश यांचे पहिले लग्न अश्विनी काळसेकरशी झाले होते तर दुसरे मुरली शर्माशी झाले आहे. नितेश ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुखच्या असिस्टंटची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जात होते. नितेशने अनेक ‘दबंग 2’, ‘खोसला का घोसला’ आणि टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तो सध्या ‘इंडियावाली माँ’, ‘अनुपमा’मध्ये काम करत होते.

 

Exit mobile version