प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे अपघाती निधन, मनोरंजन सृष्टीवर शोककळा
दोन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं (Actor Aditya Singh Rajput) मुंबईतील राहत्या घरी निधन झालं होतं. त्यानंतर आता आणखी एक दु:खद घटना मनोरंजन विश्वातून समोर येतेय. टीव्ही अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyay) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशामध्ये एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी वैभवी यांचं वय 32 वर्ष होतं. चंदिगड येथील वैभवी यांचे कुटुंबीय त्यांचं पार्थिव मुंबईत आणत आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता वैभवीच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैभवी यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. (Sarabhai vs Sarabhai fame actress Vaibhavi Upadhyay passes away in car accident)
वैभवी यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. सीआयडी, अदालत आणि साराभाई वर्सेस साराभाई या त्यांच्या काही लोकप्रिय मालिका आहेत. यामध्येही साराभाई मालिकेतील जास्मिनच्या भूमिकेने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली.
या मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वैभवीच्या मृत्यूबद्दल बोलताना जेडी म्हणाले, ‘मला वैभवीच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. ती एक सुंदर व्यक्ती आणि एक अद्भुत-कमाल काम अभिनेत्री होती. आयुष्य किती अनिश्चित आहे ते पुन्हा एकदा दिसून आलं. जास्मिनच्या पात्राने तिला एक ओळख दिली.
मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरूच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
केवळ टीव्ही मालिकाच नाही, तर मोठ्या पडद्यावरही वैभवी यांनी काम केलं होतं. 2020 मध्ये वैभवीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत ‘छपाक’ आणि ‘तिमिर’ (2023) या चित्रपटांमध्ये काम केले. वैभवी यांचं गुजराती नाट्यविश्वातील मोठे नाव होते. टीव्ही शो ‘साराभाई वर्सेस साराभाई’ व्यतिरिक्त, वैभवी यांनी ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाईंड अटॅच्ड’ या डिजिटल मालिकांमध्येही काम केले आहे.
हिमाचल प्रदेशजवळ झालेल्या या अपघातात वैभवी यांची कार दरीत पडली. यावेळी वैभवी यांचा भावी पतीही त्यांच्यासोबत कारमध्ये होता. या अपघाताची माहिती मिळताच वैभवी यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज (24 मे) अंत्यसंस्कार होणार आहेत.