मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरूच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरूच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Mumbai police arrested 19 years youth Shripad Gorathkar for tweet of blast in Mumbai : मुंबई (Mumbai) शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या (Terrorists)टार्गेटवर आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या धमक्या अनेकदा दिल्या गेल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट (Bomb blast)घडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ट्विट मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आणि अवघ्या काही तासातच पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं. श्रीपाद गोरठकर (Shripad Gorathkar)असे या तरुणाचे नाव आहे.

श्रीपाद गोरठकर (१९) हा नायगाव तालुक्यातील नावंदी येथील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो नांदेड शहरात राहत होता. दोन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांने त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुंबईत विध्वंसक कारवाई करण्याची धमकी देणारे ट्विट केले होते. हा मेसेज मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग करण्यात आला होता. ही बाब मुंबईच्या सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या निदर्शनास आली. मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबईच्या सीआययू युनिटने तात्काळ कारवाई करत मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला आणि तो युवक नांदेडमधील नावंदी येथील रहिवासी असल्याचे आढळून आले.

कुस्तीपटू आक्रमक; नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी महापंचायत

मुंबई पोलिसांनी तातडीने नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री कृष्णा कोकाटे यांना या संदर्भात माहिती दिली. सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नायगाव पोलिसांच्या मदतीने तरुणाच्या घरावर छापा टाकून तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस मुंबईला घेऊन गेले. दरम्यान, ट्विटरवर आक्षेपार्ह संदेश टाकण्यामागे या तरुणाचा हेतू काय होता आणि तो मुंबईत कोणते विध्वंसक कृत्य करणार होता, हे तपासात उघड होईल. मात्र या तरुणाच्या या कृत्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. या तरुणाने ट्विटर काय मॅसेज केला होता, नेमकी काय धमकी दिली होती, याची माहिती नांदेड पोलिसांनी दिली नाही. केवळ प्रेसनोट काढून आक्षेपार्ह पोस्ट पोलीस आयुक्तांना टॅग केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube