Download App

Oscars 2024: कला- दिग्दर्शक नितीन देसाईंना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली, पाहा व्हिडिओ…

Nitin Desai Oscars 2024: 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars 2024) लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. अत्यंत प्रतिष्ठित अशा या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वच कलाकार आणि चाहत्यांचं लक्ष लागून होतं. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या सिनेमाला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती. ‘बार्बी’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘ओपनहायमर’ या तीन सिनेमाचा मोठा बोलबाला या पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाला आहे. तर या पुरस्कार सोहळ्यात सर्वांचे लक्ष हे नितीन देसाई आणि कोरियन अभिनेता ली सुन क्युनला वाहिलेल्या श्रद्धांजलीनं लक्ष वेधलं आहे.


2 ऑगस्ट 2023 रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. देसाई यांच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली होती. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली होती.

नितीन चंद्रकांत देसाई यांना सन 2000 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’साठी तर 2003 मध्ये ‘देवदास’साठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठीतील ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य सिनेमा पुरस्कार’ देखील त्यांना सन्मानित केले होते.

Oscars 2024: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिग्गज स्टार्ससोबत बसलेला ‘तो’ श्वान नेमका कोण?

प्रोडक्शन डिझायनर म्हणून ‘लगान’, जोधा-अकबर, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’, प्रेम रतन धन पायोया यासारख्या सिनेमाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता. नितीन देसाई यांच्या कार्याची व्याप्ती प्रचंड आहे. मुंबईतील कर्जत जवळ त्यांनी एक भव्य स्टुडीओ उभा केला होता. ज्याद्वारे अनेक सिनेमांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावले. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी अनेक वेळा सेट उभारले आहेत.

follow us