ND स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी शालेय विद्यार्थांचा कलाविष्कार, फिल्मसिटीने जोपासली कलादिग्दर्शक नितिन देसाईंनी सुरु केलेली परंपरा
Nitin Desai : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्जत येथील एन. डी स्टुडीओ (N. D Studio) येथे प्रजासत्ताक दिनी ,(26 जानेवारी) परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी सुरू केलेला हा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील (Swati Mhase Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे.
यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा हलीवलीचे विद्यार्थी ‘शेतकरी नृत्य’ सादर करणार असून आसलपाडा शाळेचे विद्यार्थी ‘पथनाट्य’ सादर करणार आहेत. शारदा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी ‘लेझीम व डंबेल्स’चे सादरीकरण करणार आहेत.
कर्जत महिला मंडळ विद्या विकास मंदिराचे विद्यार्थी ‘इतिहास का में’ आणि ‘युनिटी इन डायव्हरसिटी‘ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील हातनोली कातकरवाडी शाळेतील विद्यार्थी ‘आदिवासी नृत्य’ सादर करणार आहेत.
या अनोख्या कार्यक्रमात 113 विद्यार्थी आणि 17 शिक्षकांचा सहभाग असणार आहे.अशी माहिती एन.डी चे स्टूडियो वित्त अधिकारी महेश भांगरे यांनी दिली. देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला.
एसपीएफ स्पोर्ट्स मेनियात लॉन टेनिस व बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न
2005 मध्ये त्यांनी 52 एकर जागेत कर्जत, नवी मुंबई येथे एनडी स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओत जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि कलर्स वाहिनीचा कार्यक्रम बिग बॉस सुरू आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती.