Download App

Nitin Desai : एन.डी. स्टुडिओ उभारण्यास कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट…

  • Written By: Last Updated:

Nitin Desai ND Studio and Brad Pitt connection :  सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येने मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ उभारण्यासाठी देसाईंनी त्यांचे सर्वस्व पणाला लावले होते. मात्र, याच स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. देसाईंचा कर्जत येथील स्टुडिओची सर्वदूर चर्चा व्हायची हा भव्यदिव्य स्टुडिओ उभारण्यामागे हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट कारण ठरला होता.

Gashmir Mahajani: चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर थेटच म्हणाला, “मी माझ्या…”

ऑलिव्हर स्टोनची देसाईंना ऑफर
अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोन यांनी कामासाठी नितीन देसाई यांना एक ऑफर दिली होती. त्यासाठी देसाई तब्बल नऊ दिवस स्टोन यांच्यासोबत लडाख, उदयपुरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये फिरले होते. देसाई आणि स्टोन यांना एलेक्जेंडर-द ग्रेट हा चित्रपट बनवायचा होता. याचा काही भाग भारतात शुट करायचा होता. त्यासाठी देसाई स्टोन यांना एका स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते. परंतु, ते नाराज झाले.

Nitin Desai death : छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक, बहुआयामी व्यक्तिमत्व नितीन देसाई

स्टोन यांच्या चित्रपटाचं बजेट 650 कोटींचं होतं. त्यासाठी त्यांना ज्या प्रकारची मांडणी इन्फ्रास्ट्रक्चर हवं होते ते मिळत नव्हते. त्यावेळी देसाईंच्या मनात भव्यदिव्य स्टुडिओ उभारण्याचा विचार आला जिथे विदेशातील मंडळींच्या सर्व गोष्टी पूर्ण होतील. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर देसाईंनी कर्जत येथे स्टुडिओ उभारला.

Nitin Desai death : छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक, बहुआयामी व्यक्तिमत्व नितीन देसाई

मंगल पांडे चित्रपटाचं पहिले शुटिंग
कर्जत येथे भव्यदिव्य स्टुडिओ उभारल्यानंतर देसाईंच्या एन.डी. स्टुडिओमध्ये आमिर खानच्या ‘मंगल पांडे-द राइजिंग’ या चित्रपटाचं झालं होतं. त्यानंतर ‘ट्रॅफिक सिग्नल’ सह अनेक चित्रपटांचे शुटिंग करण्यात आले. या स्टुडिओ भव्यदिव्य सेटची चर्चा झालेल्या ‘जोधा अकबर’ शूट झाला होता.

Tags

follow us