Nitin Desai death : छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक, बहुआयामी व्यक्तिमत्व नितीन देसाई
Nitin Chandrakant Desai death: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. देसाई यांनी आपल्या करिअरमध्ये वैविध्यपूर्ण काम केलं. त्यांचा अल्प जीवन परिचय जाणू घेऊ… ( short introduction of Nitin Chandrakant Desai death )
नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 ला कोकणातील दापोली येथे झाला. त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी त्यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. तर 1987 सालापासून त्याची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता आहे. त्याने हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. अशी प्रदिर्घ यशस्वी वाटचाल देसाई यांनी केली.
‘पुढल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत असतील’; पवार-मोदी भेटीनंतर राऊतांचा भाजपला इशारा
त्यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर अनेक सुपरहिट चित्रपटांचं काला दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. त्यामुळे छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक असा यशस्वी प्रवास त्यांनी केला. चित्रपटांसह त्यांनी अनेकदा दिल्लीत राजपथावर जाणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचं काला दिग्दर्शन त्यांनी केलं. तसेच त्यांनी तब्बल चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले.
त्यांनी कला दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमध्ये परिंदा, डॉन, माचिस, वजूद, जोधा अकबर, लागान, देवदास, अकेले हम अकेले तुम, प्यार तो होना ही था, सलाम बॉम्बे, सनम, बादशाह, मिशन कश्मीर, 1942 लव्ह स्टोरी, एक दो का चार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अन्नरथ, द लिजेंड ऑफ भगतसिंग, एक हिंदुस्तानी, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटांनी त्यांना ओळख दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1999), हम दिल दे चुके सनम, लागान, देवदास या चित्रपटांसाठी त्यांना तब्बल चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
दरम्यान या यशस्वी प्रवासानंतर आज सकाळी ४ वाजता कला कलादिग्दर्शक यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत होते अशी माहिती मिळत आहे. ‘स्टुडिओ हा फ्लिम वर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नसल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाली होती. तेव्हा देखील त्यांनी आर्थिक विवंचना सुरू आहे अशी भाजप आमदार महेश बालदी यांनी माहिती दिली.
तसेच त्यांच्यावर एकूण २४९ कोटींचे कर्ज होते. त्यामुळे संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता. परंतु देसाई यांच्याकडून कर्जाची रक्कम भरली गेली नाही. कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखलकरण्यात आला होता. परंतु त्याला आता सुमारे २ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.